Mumbai Police blocked actress Payal Rohatgi on Twitter; Letter sent to Amit Shah | अभिनेत्री पायल रोहतगीला मुंबई पोलिसांनी ट्विटरवर केले ब्लॉक; अमित शहांना पाठविले पत्र
अभिनेत्री पायल रोहतगीला मुंबई पोलिसांनी ट्विटरवर केले ब्लॉक; अमित शहांना पाठविले पत्र

मुंबई - बिग बॉसची स्पर्धक आणि अभिनेत्री पायल रोहतगी आपल्या ट्वीट आणि वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. आता ती चर्चेत आहे मुंबईपोलिसांनी ट्विटरवर ब्लॉक केल्यामुळे. यावेळी तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविले असून मुंबई पोलिसांनी ब्लॉक केल्यामुळे आपण असुरक्षित आहोत असे रोहतगीने म्हटले आहे. 

तसेच मुंबई पोलिसांच्या अशाप्रकारच्या वागणुकीमुळे हिंदू म्हणून हिंदुस्तानात राहायची भीती वाटत असल्याचे रोहतगीने म्हटले आहे. अभिनेत्री पायल रोहतगी सध्या सोशल मीडियावर या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने राजाराम मोहन रॉय यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केले होते. आताही तिने तसेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबई पोलिसांनी तिला ट्विटरवर ब्लॉक केले आहे. 

Web Title: Mumbai Police blocked actress Payal Rohatgi on Twitter; Letter sent to Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.