'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्याला लुटणारा आरोपी अटकेत; मानले पोलिसांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 17:28 IST2021-05-14T17:26:59+5:302021-05-14T17:28:06+5:30
'Mulgi Jhali Ho' fame actor robbed : एका कार चालकाने संमोहित करुन त्याच्याकडून ५० हजार रुपये लुबाडले होते. भानावर येताच योगेशने या प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली.

'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्याला लुटणारा आरोपी अटकेत; मानले पोलिसांचे आभार
‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील ‘शौनक जहागीरदार’ म्हणून गाजलेली भूमिका करणाऱ्या अभिनेता योगेश सोहनीला पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर काही दिवसांपूर्वी लुटले होते. एका कार चालकाने संमोहित करुन त्याच्याकडून ५० हजार रुपये लुबाडले होते. भानावर येताच योगेशने या प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी देखील त्याच्या तक्रारीची गांभीर्यानं नोंद घेत चौकशी सुरु केली. महत्वाचे म्हणजे तक्रार केल्यानंतर काही दिवसात पोलिसांनी या गुन्हेगाराला गजाआड केलं आहे. अभिनेता योगेशने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. ८ मे रोजी मुंबईतुन पुण्याकडे जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ही घटना घडली होती. प्रवास करत असताना एका व्यक्तीने त्याला अडवलं. त्यानंतर त्याला गाडीच्या बाहेर काढून त्याच्यासोबत दमदाटी केली. त्याला संमोहित केलं आणि ५० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर योगेशने तात्काळ पोलीस तक्रार केली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आणि काही दिवसातच आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीची ओळख पटलेली आहे.
इस्टाग्रामवरून व्हिडीओद्वारे योगेशने महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले आहेत. त्याची लूट झाली त्यादरम्यान त्याला अनेकांनी फोन करून विचारपूस केली. या सर्वांचेही आणि मीडियाचे त्याने आभार मानले आहेत. तसेच अशी घटना इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये म्हणून त्याने एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करताना सतर्कता बाळगा असं सांगत सर्वांना सावध केलं आहे.