गर्लफ्रेन्डसाठी अट्टल चोर बनला प्रियकर, सॅनिटरी पॅडचीही करत होता चोरी; CCTV मुळे भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 04:35 PM2021-10-19T16:35:51+5:302021-10-19T16:37:24+5:30

बैतूलच्या बाजारातील एका औषध दुकानाचा मालक काही दिवसांपासून चिंतेत होता. कारण त्याच्या हिशेबात मोठा फरक दिसत होता.

MP : Lover steal sanitary pads and cash for girlfriends from medical store, cctv revealed secret | गर्लफ्रेन्डसाठी अट्टल चोर बनला प्रियकर, सॅनिटरी पॅडचीही करत होता चोरी; CCTV मुळे भांडाफोड

गर्लफ्रेन्डसाठी अट्टल चोर बनला प्रियकर, सॅनिटरी पॅडचीही करत होता चोरी; CCTV मुळे भांडाफोड

googlenewsNext

असं म्हणतात की, प्रेम आणि युद्धात सगळं काही माफ असतं. पण कधी कधी ही बाब चुकीचीही सिद्ध होते. प्रेमाच्या नादात प्रियकर चोर झाला आणि त्याला चोर बनवणारी त्याची प्रेयसीच असेल तर....? अशीच एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या बैतूलमधील ही घटना आहे. इथे आपल्या प्रेयसीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी औषधाच्या दुकानात काम करणारा तरूण दुकानातून सतत पैसे आणि दुसऱ्या वस्तू चोरी करत होता. संशय आल्यावर दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर बघून हैराण झाला. 

जळपास २० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकानाचा कर्मचारी पैसे आणि दुसऱ्या वस्तू चोरी करताना दिसला. चोरीच्या सर्व घटना तेव्हा घडल्या जेव्हा दुकानदार नमाजसाठी बाहेर जात होता. सध्या आशिकचा चोर बनलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.

बैतूलच्या बाजारातील एका औषध दुकानाचा मालक काही दिवसांपासून चिंतेत होता. कारण त्याच्या हिशेबात मोठा फरक दिसत होता. दुकानदाराला त्याचा कर्मचारी अमन भोरसेवर संशय आला. तर त्याने सीसीटीव्ही फुटेज चेक केले.

सीसीटीव्ही फुटेज पाहून दुकानदार हैराण झाला. त्याचा कर्मचारी अमन अनेक दिवसांपासून चोरी करत होता. 
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आरोपी अमन दुकानातून कॅश काउंटर उघडून मोठ्या चलाखीने पैसे चोरी करत होता. चोरी केल्याचे एक दोन नाही तर २० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. अमन ही चोरी तेव्हा करत होता जेव्हा त्याचा मालक नमाज अदा करण्यासाठी जात होता.

दुकानदार सारिक खानच्या तक्रारीनुसार, आरोपी अमन कॅशसोबत सॅनिटायजर, औषधं, मास्क आणि सॅनिटरी पॅडही चोरी करत होता. पोलिसांनी जेव्हा अमनला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली तर त्याने आश्चर्यकारक खुलासा केला. अमनने आतापर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम आणि इतर वस्तूंची चोरी केल्याचा खुलासा केला आहे. पोलीस अधिकारी रत्नाकर हिंग्वे म्हणाले की, आरोपी अमन नर्सिंगचा विद्यार्थी आहे आणि औषधाच्या दुकानात पार्ट टाइम काम करत होता. गर्लफ्रेन्डच्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादात आरोपीने चोरीसारखं काम केलं.
 

Web Title: MP : Lover steal sanitary pads and cash for girlfriends from medical store, cctv revealed secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.