आईनेच घोटला मुलीचा गळा; मुलगी गतीमंद असल्याने केले हे दुष्कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 21:48 IST2021-08-02T21:39:57+5:302021-08-02T21:48:14+5:30
The mother strangled the gir : मुलगी गतीमंद असल्याने तिच्या आईने एका हाताने गळा आणि दुसऱ्या हाताने तोंड दाबून आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारे हे कृत्य केले.

आईनेच घोटला मुलीचा गळा; मुलगी गतीमंद असल्याने केले हे दुष्कृत्य
सांगली : शहरातील दडगे प्लॉट (संजयनगर) परिसरात दोन वर्षांच्या मुलीचा जन्मदात्या आईनेच गळा घोटून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. रविवारी दुपारी तिचा अचानक मृत्यू झाला होता. मुलगी गतीमंद असल्याने तिच्या आईने एका हाताने गळा आणि दुसऱ्या हाताने तोंड दाबून आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारे हे कृत्य केले. ज्ञानदा संजय लोकरे (वय २) असे मृत बालिकेचे नाव असून याप्रकरणी रेवती संजय लोकरे (वय २६) हिला संजयनगर पोलिसांनी अटक केली आहे.
उल्हासनगर महापालिकेचे बनावट नोकरीचे नियुक्तीपत्र देणारे रॅकेट, दोघांना अटकhttps://t.co/rlmnbieUEE
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2021
थरारक! मुलाने केला जन्मदात्याचा खून; पुसद तालुक्यात उडाली खळबळhttps://t.co/Qa35BuO6uo
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2021