खळबळजनक! लेकाला PUBG चं व्यसन, कंटाळलेल्या आईने अखेर संपवलं जीवन, वडील म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:22 IST2025-11-13T12:21:52+5:302025-11-13T12:22:46+5:30
झाशीच्या रक्सा पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

खळबळजनक! लेकाला PUBG चं व्यसन, कंटाळलेल्या आईने अखेर संपवलं जीवन, वडील म्हणतात...
झाशीच्या रक्सा पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलाच्या PUBG खेळण्याच्या आणि टीव्ही पाहण्याच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या एका आईने आत्महत्या केली. महिलेचा मृतदेह तिच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला.
३८ वर्षीय शीला सिंग असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. ती मूळची चित्रकूट जिल्ह्यातील राजपूर पोलीस स्टेशन परिसरातील हरदौली गावची रहिवासी होती. तिचं कुटुंब आता झाशीतील आरएस रेसिडेन्सी कॉलनीत राहत होते. पती रवींद्र प्रताप सिंग एचडीबी फायनान्समध्ये सेल्स मॅनेजर आहे. त्यांचा १३ वर्षांचा मुलगा अरिहंस जय हा आठवीत शिकतो.
रवींद्रने सांगितलं की त्यांच्या मुलाला ऑनलाईन PUBG खेळण्याचं आणि टीव्ही पाहण्याचं व्यसन आहे. पत्नी शीला मुलाच्या भविष्याबद्दल खूप काळजीत होती. ती त्याला वारंवार समजावून सांगत होती. रविवारी रात्री जेवणानंतर सर्वजण झोपायला गेले. रवींद्र पहाटे २ वाजता उठले तेव्हा त्यांना शीला लटकलेली दिसली.
धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. रक्सा पोलीस स्टेशनचे अधिकारी रूपेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला १०८ रुग्णवाहिकेने मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि शवविच्छेदन करण्यात आले आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला.