शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांसह मातेचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 18:27 IST

केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील बाबासाहेब चंद्रभान लाड यांच्या खुन प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करावा, यासह विविध मागण्यांसाठी मयताच्या पत्नीने आपल्या दोन मुलांसह शुक्रवार दि. २ रोजी दुपारी १२ च्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

अंबाजोगाई : केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील बाबासाहेब चंद्रभान लाड यांच्या खुन प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करावा, यासह विविध मागण्यांसाठी मयताच्या पत्नीने आपल्या दोन मुलांसह शुक्रवार दि. २ रोजी दुपारी १२ च्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.

लाडेवडगाव येथील बाबासाहेब चंद्रभान लाड यांचा दि. १७ जुलै रोजी खून झाला. या प्रकरणाचा तपास योग्य रितीने होत नसल्याचा आरोप करत मयताची पत्नी मोहर लाड यांनी गृहमंत्र्याकडे आत्मदहनाची तक्रार केली होती. शुक्रवारी मोहर ऋषीकेश (वय १४) व शुभम (वय १२) या दोन मुलांसह लाडेवडगाव येथून सकाळी अंबाजोगाईला निघाले. मोहर यांनी दिलेल्या इशाऱ्याचा पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण चौकातच पोलीसांनी बंदोबस्त लावला होता. तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत रस्त्यावर साध्या वेशात पोलीस तैनात केले होते. परंतु सदरील महिलेने आपल्या दोन मुलांसह मुख्य रस्ता व चौक वगळुन मोरेवाडीतून एका बोळीतून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतली. 

प्रवेशद्वारावर तिघांच्या हातात असणार्‍या डिझेलने भरलेल्या बाटल्या अंगावर ओतुन घेत तिघांनीही एकच टाहो फोडला. तैनात असलेल्या पोलिसांनी सतर्कता दाखवत तात्काळ हस्तक्षेप करून तिघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलीसांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, म्हणून गुन्हा नोंदविला.

टॅग्स :AmbajogaiअंबाजोगाईWomenमहिलाMarathwadaमराठवाडा