शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात २०२० मध्ये पोलिसांवर झाले सर्वाधिक हल्ले; 'तो' आरोपी अद्यापही मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 02:19 IST

विदारक चित्र : उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यावरही हल्ला

जितेंद्र कालेकरठाणे :  शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२० मध्ये ८१ सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले. त्यात सर्वाधिक ३४ हल्ले हे पोलिसांवरच झाले. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात हे हल्ले झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावरही खुनी हल्ला झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. 

कोरोनामुळे मार्च ते ऑक्टोबर दरम्यान जिल्हाभर संचारबंदी होती.  साथ प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करीत विनाकारण तसेच विनापरवाना वाहनांमधून प्रवास करणारे, रस्त्यावर फिरणारे तसेच विनापरवाना मद्यविक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कलम १८८ नुसार कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र,  अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रकार ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर व वागळे इस्टेट या परिमंडळांमधील पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात घडले. 

याशिवाय, उद्योग, ऊर्जा, कामगार, आरोग्य विभाग, ठामपा, एसटी, बेस्ट, एपीएमसी, कारागृह कर्मचारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही समाजकंटकांनी लक्ष्य केल्याचे आढळून आले.

८३ जणांवर कारवाईगेल्या वर्षभरात ३४ पोलिसांसह ८१ सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये ८३ जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ तसेच साथ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

‘तो’ आरोपी मोकाटकल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कणसे व चार कर्मचाऱ्यांवर काही हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना ४ ऑक्टोबर २०२०ला रात्री घडली. ५६० लीटर गावठी दारू पकडल्यानंतर या हल्लेखोरांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण कार्यालयात लाठ्यांनी हल्ला करून आरोपीचे अपहरण केले होते. तो आरोपी अजूनही हाती लागलेला नाही. 

टॅग्स :Policeपोलिस