2 वर्षात देशभरात 24 हजारांपेक्षा जास्त मुलांनी केल्या आत्महत्या, कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 08:01 PM2021-08-01T20:01:34+5:302021-08-01T20:01:49+5:30

NCRB Report of suicide : आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या यादीत महाराष्ट्राचा तिसरा नंबर

more than 24 thousand children committed suicide in 2 years, ncrb reports says | 2 वर्षात देशभरात 24 हजारांपेक्षा जास्त मुलांनी केल्या आत्महत्या, कारण ऐकून बसेल धक्का

2 वर्षात देशभरात 24 हजारांपेक्षा जास्त मुलांनी केल्या आत्महत्या, कारण ऐकून बसेल धक्का

Next
ठळक मुद्देपरीक्षेतील अपयशामुळे सर्वाधिक आत्महत्या

नवी दिल्ली: 2017 ते 2019 या दोन वर्षात 24,000 हजारांपेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरो(एनसीआरबी) ने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यामध्ये 14-18 वयोगटातील मुलांचा समावेश आहे. तर, या 24 हजारांपैकी 4 हजारांपेक्षा जास्त मुलांनी फक्त परीक्षेत अपयश मिळाल्यामुळे आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2017-19 दरम्यान आत्महत्या केलेल्या मुलांमध्ये 14-18 वयोगटातील 13,325 मुली तर उर्वरित मुलं आहेत. 2017 मध्ये 14-18 वयोगटातील 8,029 मुलांनी आत्महत्या केली. त्यानंतर 2018 ही संख्या वाढून 8,162 आणि 2019 मध्ये 8,377 झाली. दरम्यान, या मुलांमध्ये सर्वाधिक 3,115 मुलं मध्यप्रदेशातील आहेत. त्यानंतर पश्चिम बंगाल 2,802, महाराष्ट्र 2,527 आणि तमिळनाडुचा 2,035 समावेश आहे.

परीक्षेतील अपयशामुळे सर्वाधिक आत्महत्या
आकडेवारीनुसार, तब्बल 4,046 मुलांनी परीक्षेत अपयश मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. तर, 411 मुलींसह 639 मुलांच्या आत्महत्येमागे प्रेम प्रकरण किंवा लग्नाची समस्या होती. याशिवाय, 2567 मुलांनी आजारपणाला कंटाळून आणि 81 मुलांनी शारिरीक शोषणामुळे आत्महत्या केली.

 

Web Title: more than 24 thousand children committed suicide in 2 years, ncrb reports says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app