'आई! आम्ही आत्महत्या करतोय', पत्नीसोबत लावून घेतला गळफास, ४ महिन्यांपूर्वी केला होता प्रेमविवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 20:54 IST2022-01-20T20:53:46+5:302022-01-20T20:54:34+5:30
Suicide Case : शफीकुल शेख आणि पारुला बीबी अशी त्यांची नावे आहेत. दोघांनी चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता.

'आई! आम्ही आत्महत्या करतोय', पत्नीसोबत लावून घेतला गळफास, ४ महिन्यांपूर्वी केला होता प्रेमविवाह
दुमका: झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील शिकारीपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील जामकांदर गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोघेही पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. शफीकुल शेख आणि पारुला बीबी अशी त्यांची नावे आहेत. दोघांनी चार महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता.
आत्महत्या करण्यापूर्वी आईशी बोलले
बुधवारी रात्री दोघांचेही मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. शिकारीपाडा स्टेशन प्रभारी नवल किशोर सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती आणि आत्महत्या करण्यापूर्वी शफीकुल शेखने आपल्या आईला फोनवर सांगितले होते की, दोघेही आत्महत्या करणार आहेत.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत: एसएचओ नवल किशोर सिंह
त्यांनी सांगितले की, फोनवरील संभाषणाच्या आधारे शफीकुलचा भाऊ इतर काही लोकांसह जामकांदर येथे पोहोचला आणि पती-पत्नीला फासावर लटकलेले पाहिले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.