अल्पवयीन कर्णबधीर मुलीचा पित्यानेच केला विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 12:15 IST2018-09-08T12:14:36+5:302018-09-08T12:15:30+5:30

जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या अल्पवयीन कर्णबधीर मुलीचा  विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या नराधम पित्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Molestation of minor daughter by father at Wakad | अल्पवयीन कर्णबधीर मुलीचा पित्यानेच केला विनयभंग

अल्पवयीन कर्णबधीर मुलीचा पित्यानेच केला विनयभंग

वाकड : जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या अल्पवयीन कर्णबधीर मुलीचा  विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या नराधम पित्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने हिंजवडी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पित्याला बावधन येथील घरातून अटक करण्यात आली आहे.

 

        या बाबत माहिती अशी पीडित मुलीची आई घरकाम करण्यासाठी पहाटे घरातून बाहेर पडत असे. घरात कोणी नसल्याने गैरफायदा उठवीत आरोपीने मुलीचा विनयभंग केला आहे. सलग सात आठ महिने पित्याचे गैरकृत्य सुरू होते.हा प्रकार तिने आईला सांगितला. आईने पोलिसांकडे धाव घेऊन, फिर्याद दिली.

Web Title: Molestation of minor daughter by father at Wakad