खळबळजनक! 27 वर्षांच्या मॉडेलवर केरळमध्ये सामूहिक बलात्कार; हॉटेलमधील घटनेपूर्वी आरोपींनी केलं असं कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 13:00 IST2021-12-06T12:57:57+5:302021-12-06T13:00:21+5:30
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 आणि 2 डिसेंबर रोजी मॉडेलवर सामूहिक बलात्कार केल्याचा कथित आरोप असलेले तिनही आरोपी हे मॉडेलच्या ओळखीचे होते. सालिन नावाच्या आरोपीच्या पुढाकाराने तिला या हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते.

खळबळजनक! 27 वर्षांच्या मॉडेलवर केरळमध्ये सामूहिक बलात्कार; हॉटेलमधील घटनेपूर्वी आरोपींनी केलं असं कृत्य
नवी दिल्ली - केरळमधील (Kerala) कोची येथे एका मॉडेलवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या वत्ताने खळबळ उडाली आहे. या 27 वर्षीय मॉडेलने स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, ककनाडच्या एदाचिरा येथील हॉटेलमध्ये 3 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ केला तयार -
या मॉडेलने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरोपीने तिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळले होते आणि नंतर रूम लॉक करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान आरोपीने अनेक व्हिडिओ बनवले आणि म्हणणे न ऐकल्यास ते शेअर करण्याची धमकीही दिली आहे.
मलप्पुरमहून कोचीला बोलावले.
सामूहिक बलात्कार झालेली पीडिता केरळच्या मलप्पुरम (Malappuram) येथील रहिवासी आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वत्तानुसार, ती आरोपींच्या बोलावण्यावरून कोची येथे गेली होती.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 आणि 2 डिसेंबर रोजी मॉडेलवर सामूहिक बलात्कार केल्याचा कथित आरोप असलेले तिनही आरोपी हे मॉडेलच्या ओळखीचे होते. सालिन नावाच्या आरोपीच्या पुढाकाराने तिला या हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते.
एकाला अटक, दोन फरार -
मॉडेलच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकाला अटक केली. या प्रकरणाचा तपास करणार्या आयओंच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पीडित महिलेला न्यायालयात हजर करून, तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. याचबरोबर त्यांनी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाचीही चौकशी केली आहे. एफआयआर नोंदवल्यापासून शमीर आणि अजमल फरार आहेत. पोलीस त्यांचा तपास घेत आहेत.