मनविसेच्या शहराध्यक्षावर तलवारीने वार, हाताला दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 12:38 IST2020-10-08T12:38:00+5:302020-10-08T12:38:19+5:30

अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात आज गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी मनोज शेलार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

MNS president attacked with sword in ambernath, hand injured | मनविसेच्या शहराध्यक्षावर तलवारीने वार, हाताला दुखापत

मनविसेच्या शहराध्यक्षावर तलवारीने वार, हाताला दुखापत

अंबरनाथ : उल्हासनगर मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात मनोज शेलार यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात आज गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी मनोज शेलार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर,  या हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन धूम ठोकली. या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे घोटाळे बाहेर काढत असल्यानेच माझ्यावर हा हल्ला झाल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. याप्रकरणी, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: MNS president attacked with sword in ambernath, hand injured