अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार राजू कारेमोरे यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 03:08 PM2022-01-03T15:08:48+5:302022-01-03T15:21:41+5:30

MLA Raju Karemore arrested : ३१ डिसेंबरच्या रात्री मोहाडी ठाण्यात गोंधळ घालून अश्लील शिविगाळ केल्या प्रकरणी पोलिसांनी कारेमोरे यांना अटक केली आहे. 

MLA Raju Karemore arrested for making obscene remarks | अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार राजू कारेमोरे यांना अटक

अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार राजू कारेमोरे यांना अटक

googlenewsNext

भंडारा : माेहाडी ठाण्यात गाेंधळ घालून पाेलिसांना अश्लील शिवीगाळ प्रकरणात राष्ट्रवादीचे तुमसरचे आमदार राजू कारेमाेरे यांना साेमवारी दुपारी २ वाजता भंडारा येथे अटक करण्यात आली. त्यांच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना तात्काळ माेहाडी येथे नेण्यात आले असून तेथे न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. 

३१ डिसेंबरच्या रात्री दाेन व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार राजू कारेमाेरे माेहाडी ठाण्यात गेले हाेते. त्याठिकाणी त्यांनी प्रचंड गाेंधळ घालत पाेलिसाना अश्लील शिवीगाळ केली. या शिवीगाळीचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली हाेती. दरम्यान रविवारी पत्रकार परिषद घेवून या प्रकाराबद्दल माता-भगिनींची माफीही मागितली हाेती.

 

साेमवारी त्यांना भंडारा येथे चाैकशी साठी बाेलाविण्यात आले हाेते. तेथे चाैकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुध्द शासकीय कामात अडथळा, अश्लील शिवीगाळ आणि महिलांना लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य केल्याचा भादंवी कलम ३५३, ३५४, २९४, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९, आपीसी आरडब्ल्यू १३५ मुंबई कायदा अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. भंडारा शहर पाेलीस ठाण्यात अटकेची कारवाई करुन त्यांना थेट माेहाडी येथील न्यायालयात नेण्यात आले. न्यायालय परिसरात तगडा पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला आहे. तर माेहाडी ठाण्यासमाेर नागरिकांची माेठी गर्दभ् झाली हाेती. ही कारवाई पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भंडारा ठाण्यात उपविभागीय पाेलीस अधिकारी संजय पाटील, उपविभागीय पाेलीस रिना जनबंधू, पाेलीस उपनिरीक्षक मानकर, देशपांडे आणि भंडारा शहरचे ठाणेदार सुभाष बारसे यांच्यासह पाेलीस ताफा उपस्थित हाेता.

Web Title: MLA Raju Karemore arrested for making obscene remarks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.