दिवसेंदिवस अशा घटना वाढताहेत, गृह विभागाने तातडीनं लक्ष देणं गरजेचं; राज्य महिला आयोगाचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 04:27 PM2023-06-08T16:27:35+5:302023-06-08T17:33:33+5:30

मीरा रोडमधील या घटनेने महाराष्ट्रासह संपू्र्ण देश हादरला आहे. आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानंही घेतली आहे.

Mira Road Crime: Day by day such incidents are increasing, the home department needs urgent attention; Letter from Maharashtra Commission for Women | दिवसेंदिवस अशा घटना वाढताहेत, गृह विभागाने तातडीनं लक्ष देणं गरजेचं; राज्य महिला आयोगाचं पत्र

दिवसेंदिवस अशा घटना वाढताहेत, गृह विभागाने तातडीनं लक्ष देणं गरजेचं; राज्य महिला आयोगाचं पत्र

googlenewsNext

मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय प्रियकराने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या करून तिचे कटरने लहान लहान तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

मीरा रोडमधील या घटनेने महाराष्ट्रासह संपू्र्ण देश हादरला आहे. आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगानंही घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. तसेच, रुपाली चाकणकर स्वतः या संदर्भात पोलीस आयुक्त आणि तपास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

सदरील घटना ही अंगावर शहारे आणणारी व संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करण्यात आले आहेत.ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. दिवसेंदिवस अशा घटना वाढत असताना गृह विभागांने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.आणि सदर प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस आयुक्त यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने कार्यवाही करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करावा, असा आदेश देण्यात आले आहे.

भाईंदर पूर्वेला उड्डाणपुलाखाली शिधावाटप कार्यालयासमोर गीतानगर फेज ७ आहे. येथील गीता आकाश दीप इमारतीत ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज साहनी (५६) व सरस्वती वैद्य (३२) हे दोघे तीन वर्षांपासून भाड्याने राहत होते. या सदनिकेतून दुर्गंधी येऊ लागल्याने तसेच संशयास्पद हालचालींमुळे रहिवाशांनी बुधवारी रात्री नयानगर पोलिसांना कळवले. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी लिफ्टमधून पळून चाललेल्या सहानी याला पकडले. फ्लॅटचा दरवाजा उघडला असता मानवी शरीराचे असंख्य तुकडे दिसले. 


दहा वर्षांपासून होते प्रेमसंबंध

सहानी याचे रेशनचे दुकान असून त्याचे व सरस्वतीचे १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडत होते.

वालकर हत्याकांडातून सुचली कल्पना

सरस्वतीची हत्या करून पुरावे नष्ट करायचे असल्याने तिच्या शरीराचे असंख्य तुकडे साहनी याने कटरने केले. सरस्वती हिच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना त्याला श्रद्धा वालकर हत्याकांडातून  सुचल्याचे त्याने सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Mira Road Crime: Day by day such incidents are increasing, the home department needs urgent attention; Letter from Maharashtra Commission for Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.