अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, घराजवळील शेतात फेकला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 16:01 IST2021-11-14T15:46:09+5:302021-11-14T16:01:57+5:30

पोलिसांना घटनास्थळी 4 बिअरच्या बाटल्या आणि सिगारेटचे तुकडे सापडले आहेत, यावरुन आता तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे.

Minor girl Murder after gang rape in pilibhit UP, body found near her house | अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, घराजवळील शेतात फेकला मृतदेह

अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, घराजवळील शेतात फेकला मृतदेह

पिलीभीत:उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पिलीभीतमध्ये 12वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, अटक केलेला तरुण मृत तरुणीचा प्रियकर असल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

नेमकं काय घडलं ?
उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये 12वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. 13 नोव्हेंबर रोजी मुलगी कॉलेजसाठी निघाली होती, पण ती संध्याकाळपर्यंत परत आलीच नाही. यानंतर तिचा शोध घेतला असता, एका उसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळला. आरोपींनी शेतात नेऊन मुलीच्या तोंडात कपडा भरला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच, घटना लपवण्यासाठी बलात्कारानंतर मुलीची गळा आवळून हत्या केली. शनिवारी रात्री उशिरा मृतदेह घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या शेतात आढळून आला. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

दोनपेक्षा जास्त आरोपी
मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. तसेच, शरीराच्या आजूबाजूला रक्तही सांडलेले दिसत आहे. यावरुन तिच्यावर झालेल्या अत्याचाराची पातळी जाणवते. तर, मृतदेहापासून काही अंतरावर तिच्या वह्या, पिशवी, सायकल आणि बूट सापडले. याशिवाय पोलिसांना घटनास्थळी 4 बिअरच्या बाटल्या आणि सिगारेटचे तुकडे सापडले आहेत. आरोपींची संख्या दोनपेक्षा जास्त असल्याचा संशय आहे.
 

वडिलांचा पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप
या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मुलीच्या वडिलांचे म्हणने आहे की, मुलगी शनिवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती, मात्र बराच वेळ झाली तरी ती परत आली नाही. सायंकाळी घरच्यांनी पोलिसांत तक्रार केली, पण पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.

मुलीच्या भावाला नग्रावस्थेत मृतदेह आढळला
मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. रात्री उशिरा 11 वाजण्याच्या सुमारास मुलीच्या भावाला बहिणीची सायकल शेतात दिसली. तो जवळ पोहोचला तेव्हा त्याला आपल्या बहिणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत दिसला. यानंतर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. एसपी दिनेश पी म्हणाले की, पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार, खून आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथके तयार करण्यात आली असून, लवकरच आरोपींचा शोध घेतला जाईल.

 

Web Title: Minor girl Murder after gang rape in pilibhit UP, body found near her house