Mika Singles arrested in Dubai; Abuse of a foreign minor girl | मिका सिंगला दुबईत बेड्या; परदेशी मुलीशी गैरवर्तणूक भोवली
मिका सिंगला दुबईत बेड्या; परदेशी मुलीशी गैरवर्तणूक भोवली

मुंबई - नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला गायक मिका सिंगलादुबईत मुर्रक्काबत पोलिसांनी काल मध्यरात्री ३ वाजता बेड्या ठोकल्या आहेत. बुर दुबईतील एका बारमधून पोलिसांनी अटक केली आहे. एका ब्राझीलच्या १७ वर्षीय मुलीशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

२०१५ साली नवी दिल्लीत डॉक्टरशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी मिकावर कारवाई झाली तर २००६ साली भरपार्टीत आयटम गर्ल राखी सावंतचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याचे प्रकरण गाजले होते. त्यानंतर २०१४ साली हिट अँड रनप्रकरणी देखील मिका वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. असा हा वादग्रस्त गायक आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील वादात अडकला आहे. दुबईत असताना मिकाने १७ वर्षीय ब्राझीलचे नागरित्व असलेल्या मुलीला तिच्या मोबाईलवर आक्षेपार्ह फोटो पाठविले होते. याबाबत संबंधित तरुणीने मुर्रक्काबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मिकाला बुर दुबईतील बारमधून अटक केली. आता मिकाची अबू दाबी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

Web Title: Mika Singles arrested in Dubai; Abuse of a foreign minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.