शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एमडी तस्कर जावेदचा मृत्यू; उलट सुलट चर्चा, पोलिसांकडून चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 23:11 IST

मध्यभारतातील कुख्यात एमडी तस्कर आबू खान याचा जावेद राईट हॅन्ड मानला जायचा.  त्याच्याविरुद्ध प्राणघातक हल्लासह अनेक गुन्हे दाखल आहेत.

नागपूर : अमली पदार्थाचा तस्कर जावेद उर्फ बच्चा खान याची कारागृहात प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. यासंबंधाने उलटसुलट चर्चा सुरू झाल्यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मध्यभारतातील कुख्यात एमडी तस्कर आबू खान याचा जावेद राईट हॅन्ड मानला जायचा.  त्याच्याविरुद्ध प्राणघातक हल्लासह अनेक गुन्हे दाखल आहेत. जानेवारी २०१८ मध्ये गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. त्यानंतर आबू खानला पोलिसांनी अटक करून कारागृहात डांबले. गेल्या महिन्यातच आबूची जामिनावर कारागृहातून मुक्तता झाली. गेल्या चार-पाच दिवसांपासून जावेदची प्रकृती बिघडल्यामुळे त्याच्यावर कारागृहातील इस्पितळात उपचार सुरु होते. बुधवारी रात्री जावेदची तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री ९.३० च्या दरम्यान जावेदला डॉक्टरांनी मृत घोषित केले. विशेष म्हणजे, मंगळवारी कारागृहातील कैदी दिनेश चरपे बयाचाही मृत्यू झाला होता. २४ तासात दोघांचा मृत्यू झाल्यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. जावेदच्या  अनुषंगाने उलट-सुलट चर्चा सुरु आहे. कारागृहात चार दिवसापूर्वी मारहाणीची घटना घडली होती. यात जावेदला जोरदार मार लागल्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला, अशी चर्चा आहे. मात्र कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी त्याचा इन्कार केला. जावेदला अंडकोशाचा त्रास होता. त्याच्यावर अनेकदा उपचारही करण्यात आले होते. तो याच त्रासामुळे चार पाच दिवसापासून कारागृहातील इस्पितळात होता. आराम न झाल्यामुळे बुधवारी रात्री मेडिकलमध्ये त्याला उपचारासाठी पाठवल्याचे त्यांनी सांगितले. कारागृह प्रशासनाला काही जण जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातूनच ही चर्चा सुरू झाली असावी, असे मत कुमरे यांनी व्यक्त केले. दरम्यान, धंतोली पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.प्रशासन धास्तावलेकोरोनाच्या संक्रमणामुळे आधीच कारागृह प्रशासन धास्तावले आहे. अलीकडे कैद्याच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांनी ही धास्ती जास्तच वाढली आहे.

टॅग्स :Policeपोलिस