mau girl thrown down from roof due to resisting molestation three arrested | धक्कादायक! छेडछाडीला विरोध केला म्हणून "तिला" छतावरून फेकलं अन्...

धक्कादायक! छेडछाडीला विरोध केला म्हणून "तिला" छतावरून फेकलं अन्...

नवी दिल्ली - महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना या सातत्याने समोर येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी 'मिशन शक्ती अभियान' हाती घेण्यात आले आहे. मात्र असं असताना देखील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. छेडछाडीला विरोध केला म्हणून एका मुलीला छतावरून खाली फेकल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. छतावरून फेकल्यामुळे मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वलीदपूरमध्ये राहणारी मुलगी काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती. घरी परत येताना परिसरातील काही तरुणांनी तिला थांबवलं आणि जबरदस्तीने एका घराच्या छतावर घेऊन गेले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा करायला सुरुवात केली. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. लोक जमा झालेले पाहताच तरुणांनी तिला छतावरून खाली फेकून दिलं.

मुलीला छतावरून खाली फेकल्यानंतर तरूण फरार झाले होते. मऊचे पोलीस अधीक्षक सुशील घुले यांनी कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. मुलगी गंभीर जखमी झाली असून आझमगढच्या एका रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

हाथरस पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलांनी केला 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान आता हाथरस पुन्हा एकदा हादरले आहे. अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची माहिती मिळत आहे. हाथरसमध्ये अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांचे वय 9 आणि 12 वर्ष असल्याचं सांगण्यात आलं आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिल्यानंतर स्थानिक हाथरस पोलीस ठाण्यात बलात्काराच्या घटनेची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

Web Title: mau girl thrown down from roof due to resisting molestation three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.