hathras two boys held for allegedly raping 4 year old girl police custody | हाथरस पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलांनी केला 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

हाथरस पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलांनी केला 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

नवी दिल्ली - हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान आता हाथरस पुन्हा एकदा हादरले आहे. अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, हाथरसमध्ये अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांचे वय 9 आणि 12 वर्ष असल्याचं सांगण्यात आलं आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिल्यानंतर स्थानिक हाथरस पोलीस ठाण्यात बलात्काराच्या घटनेची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलांनी केला 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेली दोन्ही मुलं एकाच गावातील आहेत. कायद्यातील तरतुदींनुसार गुन्ह्याची नोंद करून घेण्यात आली आहे. पीडित मुलीस वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून, पुढील कारवाई सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली होती उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. अलीगड जिल्ह्यातील इगलास गावात ही धक्कादायक घटना घडली होती.

चिमुकलीवर 15 दिवसांपूर्वी बलात्कार करण्यात आला होता. प्रकृती गंभीर असल्याने मुलीवर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारानंतर मुलीचा मृत्यू झाला. मुलीचा मृतदेह दिल्लीहून राहत्या घरी आणत असताना पीडितेच्या कुटुंबियांनी रस्ता रोखला. तसेच आरोपीला शिक्षा मिळाल्यानंतरच मुलीवर अंत्यसंस्कार केले जातील असं पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी म्हटलं होतं. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईचं निधन झालं आहे. त्यामुळे सहा वर्षांची चिमुकली काही दिवसांसाठी आपल्या मावशीच्या घरी राहायला गेली होती. त्याच वेळी मावस भावाने तिच्यावर बलात्कार केला होता. 

Web Title: hathras two boys held for allegedly raping 4 year old girl police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.