शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

एटीएम चोरी करणाऱ्या टोळीच्या मास्टर माईंडच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 6:41 PM

आरोपी यांनी मार्च महिन्यामध्ये लोणीकंद येथे एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून चोरी केली असल्याबाबत दिली कबुली

ठळक मुद्देथरमॅक्स चौकात केली होती रेकी : गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी

पिंपरी : एटीएमचोरी करणाऱ्या टोळीच्या मास्टर माईंडच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. एटीएम मशीन चोरीसाठी त्याने चिंचवड थरमॅक्स चौकात रेकी केली होती. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. आरोपीला निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मेहरबानसिंग तारासिंग डांगी (वय २५, रा. ओटा स्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डांगी याने त्याचे साथीदार रामजितसिंग टाक, अजयसिंग दुधानी, पापासिंग दुधानी व श्रीकांत धोत्रे यांच्यासह चिंचवड, थरमॅक्स चौकातील एटीएम मशीन दि. ९ जून रोजी चोरून नेले होते.  निगडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपी डांगी याने या एटीएमची रेकी करून कधी चोरी करायचे हे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी एटीएम चोरून नेले. आरोपी डांगी सेंट्रल चौक येथे येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे शोध पथक सेंट्रल चौक येथे दबा धरून थांबलेले होते. त्यावेळी आरोपी डांगी हा तेथे आला. त्याला पोलिसांचा संशय आल्याने तो तेथून पळ काढू लागला. त्यास शोध पथकाने शिताफिने पकडून ताब्यात घेतले. आरोपी डांगी याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने व रामजितसिंग टाक, अजयसिंग दुधानी, पापासिंग दुधानी व श्रीकांत धोत्रे यांनी थरमॅक्स चौकाकडून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या लगत असलेले एटीएम फोडून त्यातील पैसे चोरी केले असल्याचे त्याने कबूल केले. या गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी आरोपी यांनी लोणीकाळभोर जवळील अवताडेवाडी येथून चोरी केली असल्याचे कबूल केले. तसेच आरोपी यांनी मार्च महिन्यामध्ये लोणीकंद येथे एचडीएफसी बँकेचे एटिएम फोडून चोरी केली असल्याबाबत कबुली दिली. गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे व पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, नितीन बहिरट, मयूर वाडकर, संदीप ठाकरे, गणेश मालुसरे, सावन राठोड, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, श्यामसुदंर गुट्टे, धनंजय भोसले, गोपाळ ब्रम्हांदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArrestअटकatmएटीएमThiefचोरPoliceपोलिस