Married women torture for divorce: crime charged against eight person | घटस्फोट देण्यासाठी विवाहितेचा छळ : आठ  जणांवर गुन्हा दाखल 

घटस्फोट देण्यासाठी विवाहितेचा छळ : आठ  जणांवर गुन्हा दाखल 

पिंपरी : विवाहितेला घटस्फोट देण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सन २०१६ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे घडली. 
 याप्रकरणी २४ वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती ऐत्तशाम इप्तेखार सय्यद (वय २६), सासू सगेरा इप्तेखार सय्यद (वय ४०), सासरे इप्तेखार अहमद सय्यद (वय ५०), जुनेद इप्तेखार सय्यद (वय २५), तबस्सुन नजीर शेख (वय ३०, सर्व रा. नेकनूर, बीड), नजीर शेख (वय ३५, रा. जालना), जाकेर अहमद सय्यद (वय ५१), हिना सगीर शेख  (रा. अंबेजोगाई) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. 
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  महिलेच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यासाठी सासरचे मंडळी तिला घटस्फोट देण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होते. त्यावरून तिला शिवीगाळ करून मारहाण करत होते. याबाबत महिलेने नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ही तक्रार मागे घेण्यासाठी सर्व आरोपी तिला फोनवरून धमकी देत होते. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Married women torture for divorce: crime charged against eight person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.