विवाहित मुलीकडून वडिलांना मारहाण; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:23 IST2025-01-01T13:23:23+5:302025-01-01T13:23:35+5:30
यावेळी वडिलांना वाचवण्यासाठी गेलेला भाऊ विजयलाही मारहाण केली. या प्रकरणी शिवाजी सोनवणे यांनी मुलगी मयुरी विरोधात दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

विवाहित मुलीकडून वडिलांना मारहाण; गुन्हा दाखल
भिवंडी : वडील व मुलास मागील दीड महिन्यांपासून घरातून बाहेर काढलेल्या पत्नी व मुलीला समजवायला गेलेल्या वडिलांना मुलीने मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली.
येथील अशोकनगर या निवासी संकुलातील इमारतीमध्ये सेवानिवृत्त पोस्टमास्तर शिवाजी नामदेव सोनवणे (७१) यांच्या मालकीची सदनिका आहे. परंतु त्यांची पत्नी सुशीला सोनवणे व मुलगी मयुरी पाटील यांनी गेल्या दीड महिन्यांपासून शिवाजी यांना घरातून बाहेर काढले आहे. त्यांना समजाविण्याकरीता ते गेले होते. या वेळी मुलगी मयुरी हिने आपले वडील ज्येष्ठ असल्याचे माहीत असूनही वडील व भाऊ विजय सोनवणे यांच्याशी वाद घातला. त्या वेळी मुलीला समजवताना मुलगी मयुरीने हातातील मोबाइल वडिलांना फेकून मारला. त्यानंतर तिने लाकडी काठीने वडिलांना मारहाण केली.
यावेळी वडिलांना वाचवण्यासाठी गेलेला भाऊ विजयलाही मारहाण केली. या प्रकरणी शिवाजी सोनवणे यांनी मुलगी मयुरी विरोधात दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.