शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना लग्नाचे आमिष दाखवित गंडा, हनी ट्रॅपचा प्रकार उघड; भामट्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 21:03 IST

मॅट्रिमोनीयल साईवरून महिलांना दाखवत होता लग्नाचं आमिष, भामट्याला पोलिसांकडून अटक

ठळक मुद्देमॅट्रिमोनीयल साईवरून महिलांना दाखवत होता लग्नाचं आमिष.भामट्याला पोलिसांकडून अटक.

डोंबिवली:  जीवनसाथी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल वेबसाईटवर उच्च शिक्षित महिलांना लग्नाचे आमिष दाखवित हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या भामट्याला विष्णुनगर पोलीसांनी अटक केली आहे. चौकशीत आरोपी हा प्रथम माने या खोट्या नावाने अकाउंट उघडून उच्च शिक्षित महिला विशेष करून घटस्फोटीत आणि विधवा महिलांशी ओळख करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवित त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा हे देखील उघड झाले आहे. शैलेश प्रभाकर बांबार्डेकर असे आरोपीचे नाव आहे. त्याला मुंबई, कांदीवली येथून अटक करण्यात आली आहे.

जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशनद्वारे खोटया नावाने ओळख करून जुलै 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत लग्नाचे आमिष दाखविले आणि शारीरिक संबंध ठेवले आणि 10 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याची तक्रार एका महिलेसह अन्य तिघा महिलांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात 16 एप्रिलला केली होती. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहाय्यक पोलीस निरिक्षक योगिता जाधव आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश वडणे, महिला पोलीस नाईक मिथिला मिसाळ, पोलीस शिपाई कुंदन भामरे, मनोज बडगुजर यांचे विशेष पथक नेमले होते. पथकाने कसोशीने तपास करीत आरोपी शैलेशला अटक केली आणि तक्रारदार महिलांकडून घेतलेले 140 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

पोलिसांचे आवाहनशैलेशने प्रथम माने या नावाने जीवनसाथी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल वेबसाईटवर कोणाला फसवले असल्यास तत्काळ विष्णूनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. आरोपीने तांत्रिक तपासाच्या आधारे अजून किती महिलांना फसवले आहे याबाबत आमचा तपास सुरू आहे. त्याच्यावर याआधी गुन्हे दाखल आहेत का? याचीही चौकशी सुरू असल्याची माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdombivaliडोंबिवली