'त्याने' होणाऱ्या पत्नीला शेतात बोलवलं अन् कुऱ्हाडीने कापून काढलं, कारण वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:05 IST2021-02-12T15:03:15+5:302021-02-12T15:05:19+5:30

Rajasthan Crime News : इथे एका तरूणाने त्याच्या होणाऱ्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या(Murder) केली. कारण तिचं दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण असल्याचं त्याला समजलं होतं.

Man killed her fiance after know about her relationship with other man in Rajasthan | 'त्याने' होणाऱ्या पत्नीला शेतात बोलवलं अन् कुऱ्हाडीने कापून काढलं, कारण वाचून व्हाल अवाक्....

'त्याने' होणाऱ्या पत्नीला शेतात बोलवलं अन् कुऱ्हाडीने कापून काढलं, कारण वाचून व्हाल अवाक्....

राजस्थानमधून (Rajasthan) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने त्याच्या होणाऱ्या पत्नीची निर्दयीपणे हत्या(Murder) केली आहे. असे सांगितले जात आहे की, आरोपीने होणाऱ्या पत्नीची तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याने हत्या केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यातत घेतलं असून त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. 

खोटं कारण देऊन भेटायला बोलवलं

आरोपीने पोलिसांना सांगितले की, दोन वर्षांआधी त्यांचा साखरपुडा झाला होता. पण काही दिवसांपूर्वी त्याला संशय आला की, त्याच्या होणाऱ्या पत्नीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरू आहे. त्यामुळे त्याने होणाऱ्या पत्नीला नवीन फोन देणार असल्याचं कारण देत तिला भेटायला बोलवलं. तो तिला शेतातील खोलीत घेऊन गेला आणि तिथेच त्याने तिची हत्या केली. (हे पण वाचा : धक्कादायक! विवाहित महिलेचे अनेकांसोबत होते अनैतिक संबंध, त्यातील एकाने रचला मर्डरचा प्लॅन कारण....)

तिने प्रेम प्रकरण असल्याचं मान्य केलं....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सांगितले की, जेव्हा या व्यक्तीने होणाऱ्या पत्नीला तिच्या प्रेमसंबंधाबाबत विचारले तेव्हा तिने ते असल्याचं मान्य केलं होतं. ज्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण सुरू असताना संतापलेल्या व्यक्तीने होणाऱ्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. नंतर तिचा मृतदेह शेतातच खड्डा करून पुरला. (हे पण वाचा : धक्कादायक! आपल्याच वडिलांच्या प्रेमात पडली मुलगी, आई अन् ९ वर्षीय बहिणीच्या हत्येसाठी केली मदत....)

कसा झाला खुलासा?

मुलीच्या घरच्या लोकांनी सांगितले की, ज्या व्यक्तीसोबत तिचा साखरपुडा झाला होता. त्यानेच तिला भेटण्यासाठी बोलवलं होतं. पण सायंकाळ होऊनही ती घरी परतली नाही आणि दोघांचेही नंबर बंद येत होते. नंतर काही वेळाने आरोपीचा नंबर सुरू झाला. त्याने तेव्हा सांगितले की, मी तिला १२ वाजता घेऊन गेलो होतो आणि २ वाजता परत आणून सोडलं होतं. 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतात काम करणाऱ्या लोकांना मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.  ज्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. तेच मुलीच्या घरच्या लोकांनी तिचा मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. मात्र, नंतर पोलिसांनी वातावरण शांत करत मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला आणि परिवाराकडे सोपवून अंत्यसंस्कार केला.
 

Web Title: Man killed her fiance after know about her relationship with other man in Rajasthan