धक्कादायक! आपल्याच वडिलांच्या प्रेमात पडली मुलगी, आई अन् ९ वर्षीय बहिणीच्या हत्येसाठी केली मदत....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 10:33 AM2021-02-12T10:33:59+5:302021-02-12T10:42:35+5:30

Minor Kills Her Mohter And Sister: ब्राझीलच्या (Brazil) साओ पाउलोमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Minor Kills Her Mohter And Sister: ब्राझीलच्या (Brazil) साओ पाउलोमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ३४ वर्षीय सावत्र वडिलांच्या प्रेमात पडली.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, अल्पवयीन मुलीने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की, ती तिच्या आईचा फार जास्त राग करत होती. मात्र, ती हे सुद्धा म्हणाली की, तिने तिच्या आईला आणि बहिणीला मारले नाही.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान जेव्हा आरोपीच्या घरामागील जमीन खोदली गेली तेव्हा तिथून दोन मृतदेह आढळून आले. यात एक आरोपीच्या पत्नीचा आणि दुसरा ९ वर्षीय मुलीचा मृतदेह होता.

आरोपीच्या घरातूनच पत्नी आणि मुलीचा मृतदेह सापडल्यावर एकच गोंधळ उडाला. नंतर पोलिसांनी हे धक्कादायक हत्याकांड करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या १६ वर्षीय अल्पवयीन सावत्र मुलीला अटक करण्यात आली.

पोलिसांनुसार, १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या ३४ वर्षीय सावत्र वडिलांच्या प्रेमात पडली होती. आरोपीने अनेकदा आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैगिक शोषण केलं.

ही मुलगी आपल्या आईचा राग करत होती. त्यामुळे तिने आपल्या आईच्या आणि बहिणीच्या हत्येत सावत्र वडिलांची साथ दिली.

अल्पवयीन मुलीसोबत मिळून आपल्या पत्नी आणि दुसऱ्या मुलीची हत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव फॅब्रिसियो एरिना आहे. त्याचं वय ३४ वर्षे आहे.

फॅब्रिसियो एरिनाने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपी फॅब्रिसियोने चौकशी दरम्यान सांगितले की, त्याने नोव्हेंबर २०२० मध्ये भांडणादरम्यान पत्नीची हत्या केली.

आरोपी वडील फॅब्रिसियो एरिनाने सांगितले की, पत्नीच्या हत्येच्या एक महिन्यानंतर त्याने आपल्या ९ वर्षाच्या मुलीचीही हत्या केली.

कारण ती सतत तिच्या आईबाबत विचारणा करत होती. मुलगी सतत आईबाबत विचारत असल्याने तो संतापला होता.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, अल्पवयीन मुलीने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की, ती तिच्या आईचा फार जास्त राग करत होती. मात्र, ती हे सुद्धा म्हणाली की, तिने तिच्या आईला आणि बहिणीला मारले नाही.