13 वर्षांच्या मुलीला अचानक सुरू झाली पोटदुखी, डॉक्टरांनी केली तपासणी, तर समोर आला एक 'गुन्हा'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 11:23 IST2024-03-20T11:19:52+5:302024-03-20T11:23:50+5:30

माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, संबंधित पीडितेच्या पोटात रविवारी अचानकपणे दुखू लागले. ती बेशुद्ध पडली. तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानतंर डॉक्टरांनी तपासणी केली अन्...

man held for raping on 13-year-old girl suddenly started stomach pain pregnancy case registered under pocso act | 13 वर्षांच्या मुलीला अचानक सुरू झाली पोटदुखी, डॉक्टरांनी केली तपासणी, तर समोर आला एक 'गुन्हा'!

13 वर्षांच्या मुलीला अचानक सुरू झाली पोटदुखी, डॉक्टरांनी केली तपासणी, तर समोर आला एक 'गुन्हा'!


उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील मुरादनगर येथे एक 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घठना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी एका 20 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, संबंधित पीडितेच्या पोटात रविवारी अचानकपणे दुखू लागले. ती बेशुद्ध पडली. तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानतंर डॉक्टरांनी तपासणी केली असता, ती गर्भवती असल्याचे तिच्या वडिलांना समजले.  

यासंदर्भात, पीडितेच्या वडिलांनी पीडितेकडे विचाणा केली असता, जेव्हा आपण घरी एकटे राहत होतो, तेव्हा आरोपी घरी येत होता आणि बलात्कार करत होता, असे तीने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागती अशी धमकीही त्याने दिली होती. 

यासंदर्भात बोलातना मसुरीचे सहायक पोलीस आयुक्त नरेश कुमार यांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी तक्रार केली आहे. यात आरोपी मुलीचे लैंगिक शोषण करत होता. पीडिता सहाव्या वर्गात शिकते, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, घरात वाद झाल्यानंतर आई महेरी निघून गेली, यामुळे ती आपल्या वडिलांसोबत राहत होती.

POCSO कायद्यांदर्गत गुन्हा दाखल -
पीडितेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विरोधात सोमवारी भारतीय दंड संहितेतील कलमे आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO) यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 

Web Title: man held for raping on 13-year-old girl suddenly started stomach pain pregnancy case registered under pocso act