शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कुऱ्हाडीने घाव घालून आधी केली बायकोची हत्या; गळफास घेत नवऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 12:04 IST

Pune Crime News : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनकवडी - चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालत खून केला. यानंतर त्याने स्वत: साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना कात्रज येथील मांगडेवाडी येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता तुकाराम कोरे, वय ३२ वर्षे, तुकाराम गंगाधर कोरे, वय ४० वर्षे राहणार सुंदरबन, मांगडेवाडी, कात्रज असे मयत पती पत्नीचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. 

पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनिताची बहिण व तुकारामची पत्नी जगदेवी कोरे हिने फिर्याद दाखल केली आहे. तुकाराम कोरे हा रिक्षा चालक होता तर अनिता ही एका रुग्णालयात हाऊस किपींगचे काम करत होती. फिर्यादी जगदेवी कोरे आणी तुकाराम कोरे हे पती पत्नी होते. तर अनिता ही जगदेवीची बहीण होती. तुकारामने नऊ वर्षापुर्वी अनिताच्या गळ्यात हार घालून घरातच तीच्याशी विवाह केला होता. तेव्हापासून तिघेही एकत्रच राहत होते. 

तुकारामला दोन्ही पत्नींपासून चार मुलेही आहेत. दरम्यान मागील तीन महिन्यांपासून तुकाराम अनितावर चारित्र्याचा संशय घेत होता. तेव्हापासून त्यांच्यामध्ये वादावादी होत होती. याच कारणावरुन त्यांच्यामध्ये शुक्रवारी रात्री भांडणे झाली. तुकारामने रागाच्या भरात अनितावर कुऱ्हाडीने वार करुन तीचा खून केला. यानंतर त्याने स्वत: घरातील लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास घेतला. ही घटना जगदेवीने पोलिसांना सांगितली. यानंतर घटनास्थळी उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, वैभव गायकवाड, उपनिरीक्षक समाधान मचाले यांनी भेट दिली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेMurderखूनDeathमृत्यूPoliceपोलिस