A man arrested after six months who raped brother's wife in jalgaon | सख्ख्या वहिनीवर बलात्कार करणाऱ्या दिराला सहा महिन्यानंतर अटक

सख्ख्या वहिनीवर बलात्कार करणाऱ्या दिराला सहा महिन्यानंतर अटक

ठळक मुद्दे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च २०२० सकाळी पावणे सात वाजता पीडिता एकटी घरात असताना तिचा दिर घरात आला आणि अचानक दरवाजा बंद करुन शरीर संबंधाची मागणी करायला लागला.

जळगाव - सख्ख्या मोठ्या वहिनीवर बलात्कार करणाऱ्या ३३ वर्षीय संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी नशिराबाद येथून अटक केली. संशयित हा सहा महिन्यापासून फरार झाला होता. संशयित हा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच वास्तव्याला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च २०२० सकाळी पावणे सात वाजता पीडिता एकटी घरात असताना तिचा दिर घरात आला आणि अचानक दरवाजा बंद करुन शरीर संबंधाची मागणी करायला लागला. त्यास पीडितेने नकार दिला असता तिच्या डोक्यातील केस तोंडात दाबून जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर वरुन पाचशे रुपये देतो असे सांगून कोणाला सांगू नको असे म्हणून निघून दिला. 

 

हा प्रकार लागलीच पीडितेने पतीला सांगितला. त्याची चर्चा झाल्यानंतर संशयित फरार झाला. दरम्यान, याआधी देखील त्याने पीडिता एकटी असताना घरात येऊन शरीरसुखाची मागणी करुन माझ्यापासून एक मुलगा होऊ दे असे म्हणत होता असेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पीडितेचा हा दुसरा विवाह असून पहिल्या पतीपासून ४ वर्षाची मुलगी असून दुसºया पतीपासूनही एक अपत्य आहे. या घटनेनंतर पीडिता औरंगाबाद जिल्ह्यात निघून गेली होती.१२ मार्च रोजी हा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील संशयित नशिराबाद येथे असल्याची माहिती कॉन्स्टेबल इम्रान सय्यद यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक विशाल सोनवणे, गोविंदा पाटील, इम्रान सय्यद व संदीप पाटील यांच्या पथकाने बुधवारी सकाळीच त्याला अटक केली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

 

Web Title: A man arrested after six months who raped brother's wife in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.