शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

दांडिया, डीजे बंद करायला गेलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 14:28 IST

जाकीर हुसेन कॉलनीतील घटना; तिघांना अटक

ठळक मुद्देयाप्रकरणी सतीश तायडे, विनोद तायडे या दोन भावांसह त्यांची आई नलिनी तायडेया तिघांना अटक करण्यात आली आहे.पोलीस वाहनात बसवून घेवून जात असताना विनोदची आई नलीनी तायडे व भाऊ सतीश तायडे यांनी आरडाओरड करत दोघेही वाहनासमोर आडवे झाले.

जळगाव - शासनाने निर्धारित केलेल्या वेळेनंतरही सुरु असलेला डीजे आणि दांडिया बंद करण्यासाठी गेलेल्या रामानंद नगर पोलिसांशी जाकीर हुसेन कॉलनीत काही जणांनी अरेरावी तर महिला उपनिरीक्षकास धक्काबुक्की केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता घडला. याप्रकरणी सतीश तायडे, विनोद तायडे या दोन भावांसह त्यांची आई नलिनी तायडेया तिघांना अटक करण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाने डीजेला बंदी घातली आहे, असे असतांनाही जाकीर हुसेन कॉलनीत मंगळवारी रात्री माँ नवदुर्गा उत्सव मित्र मंडळातर्फे डी.जे वाजवून दांडीया सुरु होता.गस्तीवर असलेल्या रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक कांचन काळे, नाईक विजय खैरे, ज्ञानेश्वर पाटील व चालक संतोष पाटील यांच्या पथकाला जाकीर हुसेन कॉलनीत रात्री ११.४५ वाजता उशिरापर्यंत दांडिया व डीजे सुरु असल्याचे निदर्शनास आले. वाद्य व दांडियाला १० वाजेपर्यंतच परवानगी आहे, आता वेळ झाली ते बंद करा असे पोलिसांनी विनोद तायडे याला सांगितले असता,त्याने उलट कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषा वापरुन तुमच्याकडून जे होईन ते करा असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस वाहनात बसवून घेवून जात असताना विनोदची आई नलीनी तायडे व भाऊ सतीश तायडे यांनी आरडाओरड करत दोघेही वाहनासमोर आडवे झाले.

उपनिरीक्षकाला हात ओढून धमकावलेविनोद याला वाहनात बसवताच नलिनी तायडे यांनी महिला उपनिरीक्षक कांचन काळे यांना हात धरुन ओढत आम्ही तुम्हाला येथून जावू देणार, मुलाला सोड अशी धमकी दिली. यावेळी दोघांनी मोठमोठ्याने आरडाओरड केला. पोलिसांनी विनोद याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे यांच्या फिर्यादीवरुन विनोद तायडे, नलिनी तायडे व सतीष तायडे या तिघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद तायडे याला तर सतीश व त्याची आई नलिनी या दोघांना सकाळी अटक करण्यात आली.

टॅग्स :DandiaदांडियाJalgaonजळगावPoliceपोलिसArrestअटकgarbaगरबा