शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

Kolhapur Crime | "मी सांगायचं काम केलं, आता मृतदेह तुम्ही शोधून काढा..."; फोन आला नि पोलिसही चक्रावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 11:46 IST

पोलिसांनीही सांगितलेल्या ठिकाणी तपास केला, वाचा तिथे नेमकं काय घडलं...

सरदार चौगुले - पोर्ले तर्फ ठाणे (कोल्हापूर): "मी एका महिलेचा खून केला आहे. तिला तुम्हीच शोधून काढा. ते तुमचं काम आहे," असे एका माथेफिरूने पोलिसांना फोन करून सांगितले आणि त्यांना आव्हान देत चक्रावून सोडले. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांची वाघबीळ घाटाचा डोंगर शोधला; परंतू मृतदेह कोठेही आढळून आला नाही. घटनास्थळी रक्ताने माखलेले अंथरूण, जागोजागी पडलेले रक्ताचे डाग आणि माथेफिरूचे हातात धारधार विळा घेऊन रस्त्यावरील वाहनधारकांच्या पाठिमागे लागणे खूनाचा केलेला बनाव. वाघबीळ घाटात माथेफिरूने घातलेल्या गोंधळामुळे पोलिसांसह सर्वांची झोप उडवून टाकली होती. या घटनेची करवीर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.

अधिक माहिती अशी, कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील वाघबीळ घाटातील चिले मंदिराजवळ शनिवारी (२८ जाने.) सकाळी बाराच्या सुमारास प्रविण विष्णू कांबळे (वय ३०, रा. चिखली, ता. शिराळा, जि.सांगली) हा माथेफिरू तरूण हातात विळा घेऊन, 'मी एका महिलेचा खून केला आहे. तिला घाटात बघायला जा' असे वाहनांच्या मागे लागून सांगत होता. हे वृत्त अज्ञातांनी पन्हाळा पोलिसांना सांगितले. त्यानंतर पन्हाळा, कोडोली आणि करवीर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन त्या माथेफिरूला ताब्यात घेतले.

लोकांची गर्दी बघून बेशुध्द असल्याचा बनाव केलेला प्रविण पोलिसांना बघून शुध्दीवर आला. त्याच्याकडे चौकशी केली, तर मी माझ्या बहिणींचा खून केला. तुम्ही तिला शोधा, ते तुमचे काम आहे, असे तो म्हणाला. त्याच्या सांगण्यावरून बाजूला चौकशी केली तर रात्र घालविलेल्या जागेवर अंथरूण रक्ताने माखले होते आणि त्यावरती बोटाने लिहिले असल्याने खूनाचा संशय वाढला.

त्यानंतर कोडोलीचे पोलिस निरीक्षक डोईजड, पोलिस पाटील सचिन भोपळे, पंडीत नलवडे यांनी वाघबीळ घाट पिंजून काढला; परंतु मृतदेह सापडला नाही. प्रविणने डाव्या हाताची नस कापली असल्याचे दिसले. तेच रक्त अंथरूण आणि विळ्याला लागले असल्याचे पाहून प्रविणने खूनाचा बनाव केला असल्याचे निष्पन्न झाले. त्याला रूग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवले गेले. प्रविणचा भाऊ प्रशांत यानी आईच्या निधनानंतर प्रविण मानसिक दडपणाखाली असून तो निनाई चिखली साखर कारखान्यात काम करतो, असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस