मुलगी दुसरी येते म्हणून प्रथम विद्यार्थ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 12:34 IST2022-09-06T12:33:57+5:302022-09-06T12:34:32+5:30

नुकत्याच झालेल्या एका परीक्षेत वर्गातून पहिला आला हाेता. तर अरुल मेरी ही विद्यार्थिनी दुसरी आली हाेती. त्यामुळे तिची आई व्हिक्टाेरिया या चिडल्या हाेत्या.

Killing the first student as the girl comes second | मुलगी दुसरी येते म्हणून प्रथम विद्यार्थ्याची हत्या

मुलगी दुसरी येते म्हणून प्रथम विद्यार्थ्याची हत्या

पुदुच्चेरी : मत्सर किती धाेकादायक ठरू शकताे, याची प्रचिती देणारी घटना पुदुच्चेरीमध्ये घडली आहे. आपली मुलगी दुसरी येते म्हणून तिच्या आईने वर्गात पहिला आलेल्या विद्यार्थ्याची हत्या केली. 

मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव बाला मणिकंदन असे आहे. ताे कराईकल येथील एका खासगी शाळेत इयत्ता आठवीचा विद्यार्थी होता. ताे नुकत्याच झालेल्या एका परीक्षेत वर्गातून पहिला आला हाेता. तर अरुल मेरी ही विद्यार्थिनी दुसरी आली हाेती. त्यामुळे तिची आई व्हिक्टाेरिया या चिडल्या हाेत्या. व्हिक्टाेरिया यांनी बाला याच्यासाठी शाळेत चाैकीदाराच्या हस्ते शीतपेयांच्या दाेन बाटल्या पाठविल्या.  त्यात विष टाकण्यात आले हाेते. ताे प्यायल्यानंतर बालाची तब्बेत बिघडली. रुग्णालयात बालाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
 

Web Title: Killing the first student as the girl comes second