शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 08:42 IST

रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे भायखळा परिसरात खळबळ माजली आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राज्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते. मुंबईतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर काही अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र तिथे त्यांचा जीव गेला. या घटनेनं भायखळा इथं खळबळ माजली आहे. 

भायखळा इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाचं काम करणारे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर रात्री काही अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी जागेचा पंचनामा केला. रात्री दहा ते बाराच्या सुमारास कुर्मी यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलीस जेव्हा इथं पोहचले तेव्हा सचिन कुर्मी गंभीर अवस्थेत जखमी झाले होते. त्यांना पोलिसांच्या वाहनातून जेजे रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले.

सध्या या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. नेमकं सचिन कुर्मी यांचा कुणाशी वाद होता का, ही हत्या का करण्यात आली या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सचिन कुर्मी हे भुजबळांचे समर्थक होते. या घटनेनंतर राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ हे नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. आज समीर भुजबळ हे कुर्मी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार