Kerala Elephant Death : "लोकांची चिंता व्यर्थ जाणार नाही, न्यायाचाच विजय होईल"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 19:50 IST2020-06-04T19:46:17+5:302020-06-04T19:50:58+5:30
पिनरई विजयन यांनी म्हटले आहे, "पलक्कड जिल्ह्यात एका दुःखद घटनेत, एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. आपल्यापैकी अनेकांनी आमच्याशी संपर्क केला आहे. आम्ही आपल्याला विश्वास देतो, तुमची चिंता व्यर्थ जाणार नाही. न्यायाचाच विजय होईल."

Kerala Elephant Death : "लोकांची चिंता व्यर्थ जाणार नाही, न्यायाचाच विजय होईल"
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये गर्भवती हत्तीणीच्या झालेल्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, की पलक्कड जिल्ह्यात एका दुःखद घटनेत, एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. आपल्यापैकी अनेकांनी आमच्याशी संपर्क केला आहे. आम्ही आपल्याला विश्वास देतो, तुमची चिंता व्यर्थ जाणार नाही. न्यायाचाच विजय होईल.
मुख्यमंत्री म्हणाले, तीन संशयितांवर लक्ष केंद्रित करून तपास सुरू आहे. पोलीस आणि वन विभाग संयुक्तपणे घटनेची चौकशी करत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा वनाधिकाऱ्यांनी आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विजयन म्हणले, केरळ हे एक असेराज्य आहे, जेथे अन्यायाविरोधातील नाराजीचा सन्मान केला जातो.
Kerala Elephant Death: "हत्तीणीने कोणाचं काय वाईट केलं होतं?, तिला मारणाऱ्यांची संस्कृती कोणती?"
असे आहे पूर्ण प्रकरण -
काहीतरी खायला मिळेल म्हणून ही गर्भवती हत्तीण आशेनं जंगलाजवळील एका गावात आली होती. यावेळी येथीव काही विक्रुत माणसांनी तिला अननसातून फटाके दिली. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीणीला हे समजण्यास विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि वेलियार नदीत वर गेली. ती येथे पाण्यात तब्बल तीन दिवस तोंड टाकून उभी होती. यानंतर तिचा आणि तिच्या गर्भात वाढणाऱ्या तिच्या पिल्लाचा मृत्यू झाला.
"कोरोना वाढतोय, तयार करावी लागतील 'मेक शिफ्ट' रुग्णालयं"; मोदी सरकारची सर्वोच्च न्यायालयात कबुली