Kerala Elephant Death: "हत्तीणीने कोणाचं काय वाईट केलं होतं?, तिला मारणाऱ्यांची संस्कृती कोणती?"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 07:40 PM2020-06-04T19:40:44+5:302020-06-04T19:51:11+5:30

Kerala Elephant Death: अननसातून फटाके खायला देऊन केरळमधील मल्लापूरम भागातील रहिवाशांनी या हत्तीणीची हत्या केल्याचा संशय आहे. सोशल मीडियावर या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे.

kumar vishwas pours his hear out over gruesome killing of pregnant elephant kerala | Kerala Elephant Death: "हत्तीणीने कोणाचं काय वाईट केलं होतं?, तिला मारणाऱ्यांची संस्कृती कोणती?"

Kerala Elephant Death: "हत्तीणीने कोणाचं काय वाईट केलं होतं?, तिला मारणाऱ्यांची संस्कृती कोणती?"

Next

केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला आहे. अननसातून फटाके खायला देऊन केरळमधील मल्लापूरम भागातील रहिवाशांनी या हत्तीणीची हत्या केल्याचा संशय आहे. सोशल मीडियावर या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी, सेलिब्रिटींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. डॉ. कुमार विश्वास यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत आपला संताप व्यक्त केला आहे. 

कुमार विश्वास यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. 'उमा नावाच्या गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातलं. तिची हत्या केली. त्या हत्तीणीने कोणाचं काय वाईट केलं होतं?, भारतीयांमध्ये हे कोणतं विष पेरलं गेलं आहे?, हे लोक काय शिकले आहेत?, तिला मारणाऱ्यांची संस्कृती कोणती? अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. 

"I can’t Breathe.. I can’t Breathe.... मी हे दुःख सहन करू शकत नाही. मी याआधीही म्हटलं आहे की जोपर्यंत धर्म-जात-देश-प्रदेश-दल-आस्था यांच्या नावे माणसं घृणास्पद कृत्यं करत आहेत. वैमनस्य आणि हिंसेची बीजं रोवत आहेत. विष असलेली नवी पिढी जन्म घेईल. कोण आहेत ते तरुण ज्यांनी महादेवाच्या पत्नीचं नाव असलेल्या उमा नावाच्या गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातलं. तिची हत्या केली. त्या हत्तीणीने कोणाचं काय वाईट केलं होतं? इतक्या घृणास्पद पद्धतीने एका हत्तीणीला ठार करण्यात आलं. ती हत्तीण वेदनेने विव्हळत होती. मात्र त्या अवस्थेतही तिने कोणालाही त्रास दिला नाही. तिचा जबडा तुटून पडला. तिच्या गर्भात असणारा जीव गेला. ती हत्तीण पाण्यात बसून  रडत मृत्यूला सामोरी गेली. भारतीयांमध्ये हे कोणतं विष पेरलं गेलं आहे? हे लोक काय शिकले आहेत?, तिला मारणाऱ्यांची संस्कृती कोणती?" असं कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे. 

केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूची गंभीर दखल केंद्र सरकारनेही घेतली असून, दोषींना पकडून कठोर कारवाई करण्याची ग्वाही केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. आरोपींची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याची घोषणा काही स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. घटना इतकी वेदनादायी आहे की, हा निर्दयीपणा करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी, क्रीडापटूंनी हत्तीणीच्या हत्येबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लवकर रेस्टॉरंट सुरू होणार, 'या' गोष्टी बदलणार; जाणून घ्या नेमकं कसं असणार?

CoronaVirus News : मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी त्याने लढवली अनोखी शक्कल; केलं असं काही...

CoronaVirus News : सर्वसामान्यांसाठी खूशखबर! 'या' जीवनावश्यक वस्तू झाल्या स्वस्त

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार

CoronaVirus News : ...म्हणून चेन खेचून मजुरांनी काढला ट्रेनमधून पळ; रेल्वे स्थानकावर झाला गोंधळ

CoronaVirus News : कोरोनामुळे बाप-लेकाची ताटातूट! नवजात बाळाला पाहण्यासाठी 'तो' व्याकूळ झाला पण...

Web Title: kumar vishwas pours his hear out over gruesome killing of pregnant elephant kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.