"कोरोना वाढतोय, तयार करावी लागतील 'मेक शिफ्ट' रुग्णालयं"; मोदी सरकारची सर्वोच्च न्यायालयात कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 04:23 PM2020-06-04T16:23:05+5:302020-06-04T16:32:23+5:30

केंद्र सरकारने सादर केलेल्या या शपथपत्रात म्हटले आहे, की देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, सध्या असलेल्या रुग्णालयांशिवाय, भविष्यात कोरोनाबाधितांसाठी मेक शिफ्ट रुग्णालयेदेखील तयार करावी लागतील.

Central govt said in sc need of large number of makeshift hospitals for coronavirus patients | "कोरोना वाढतोय, तयार करावी लागतील 'मेक शिफ्ट' रुग्णालयं"; मोदी सरकारची सर्वोच्च न्यायालयात कबुली

"कोरोना वाढतोय, तयार करावी लागतील 'मेक शिफ्ट' रुग्णालयं"; मोदी सरकारची सर्वोच्च न्यायालयात कबुली

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारने गुरुवारी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले.केंद्र सरकारने सादर केलेल्या या शपथपत्रात म्हटले आहे, की देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशभरात आतापर्यंत १ लाख ४ हजार १०७ जण कोरोनामधून मुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील रिकव्हरी रेट ४७.९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 


नवी दिल्ली :केंद्र सरकारने गुरुवारी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले. यात, 'देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत देशात मोठ्या प्रमाणावर मेकशिफ्ट हॉस्पिटल्स तयार करावे लागतील,' अशी कबूल केंद्र सरकारने दिली आहे.

केंद्र सरकारने सादर केलेल्या या शपथपत्रात म्हटले आहे, की देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, सध्या असलेल्या रुग्णालयांशिवाय, भविष्यात कोरोनाबाधितांसाठी मेक शिफ्ट रुग्णालयेदेखील तयार करावी लागतील. जेने करून कोरोनाबाधितांवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येईल. सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले, की सध्या फ्रंटलाइन सर्व्हिस देत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार पूर्णपणे प्रयत्नरत आहे.

आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया

देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वात जास्त, तब्बल 9,304 रुग्ण समोर आले आहेत. तर 260 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारपर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 16 हजार 919 वर पोहोचला. तर आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 6 हजार 75 जणांचा मृत्यू झाला. अमेरिका, ब्राझील, रशिया, इंग्लंड, स्पेन आणि इटलीनंतर आता भारत जगातील सर्वाधिक कोरोना प्रभावित देशांच्या यादीत जाऊन बसला आहे. 

जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान

देशात रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत असताना दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या एक लाखांहून अधिक झाली आहे. देशभरात आतापर्यंत १ लाख ४ हजार १०७ जण कोरोनामधून मुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील रिकव्हरी रेट ४७.९९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 

दिलासादायक!: "ऑक्‍टोबरपर्यंत तयार होईल कोरोना व्हॅक्‍सीन?"; जाणून घ्या, भारतासह जगातील 10 लेटेस्ट अपडेट्स

Read in English

Web Title: Central govt said in sc need of large number of makeshift hospitals for coronavirus patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.