'जास्त मोठा झाला का?' म्हणत कल्याणच्या कुख्यात गुंडाकडून कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

By मुरलीधर भवार | Updated: March 6, 2026 18:50 IST2026-03-06T18:49:48+5:302026-03-06T18:50:55+5:30

कल्याणमध्ये राहणारे विशाल नायडू हे रेल्वेचे कंत्राटदार आहेत

Kalyan crime gangster prashant alias pd fatally attacks railway contractor vishal naidu | 'जास्त मोठा झाला का?' म्हणत कल्याणच्या कुख्यात गुंडाकडून कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

'जास्त मोठा झाला का?' म्हणत कल्याणच्या कुख्यात गुंडाकडून कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

मुरलीधर भवार, कल्याण: 'जास्त मोठा झाला का? आता तुला बघतो' अशी धमकी देत आपल्या हस्तकांना पाठवून एका रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा हल्ला करविणारा कल्याणमधील कुख्यात गुंड प्रशांत देशमुख उर्फ पीडी आहे. बाजारपेठ पोलिसांनी कंत्राटदाराच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पीडी याने गेल्या काही वर्षापासून अनेकांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.

कल्याणमध्ये राहणारे विशाल नायडू हे रेल्वेचे कंत्राटदार आहेत. होळीच्या दिवशी त्यांच्या एका मित्राचा फोन त्यांना आला. त्या मित्राने नायडू यांना सांगितले की, प्रशांत देशमुख याच्याची बेालून घे. प्रशांत देशमुख आणि विशाल नायडू यांची ओळख आहे. परंतू विशाल नायडू यांच्या मित्रावर चार वर्षापूर्वी हल्ला झाला होता. त्या हल्लाा प्रकरणात प्रशांत देशमुख याचे नाव आले. त्यामुळे विशाल याने प्रशांत याच्याशी बोलणे बंद केले. होळीच्या दिवशी विशाल नायडू आणि त्याचा मित्र अनिकेत माने हे विशालच्या घरी असताना अनिकेत माने याच्या मोबाईलवर प्रशांत देशमुख याचा फोन आला. प्रशांतने अनिकेतला सांगितले की, विशाल नायडूला मला फोन करायचाल सांग.

विशाल नायडूने प्रशांत देशमुखला फोन केला. प्रशांतने त्याला शिवि दिली. तूला चरबी आली आहे. तुला खूप मोठे व्हायचे आहे. आमच्या पुढे जातो का ? असे सांगून आज तुला मारायला प्रतिकला पाठवतो. या नंतर विशाल याने प्रशांतला सांगितले असे काही नाही. दोन दिवसांनी तुला भेटतो. त्यानंतर विशाल नायडू जेवण आणण्यासाठी घराखाली उतरले. आधारवाडी सर्कल समोर आले असता त्याठिकाणी प्रतिक ठाकरे , शुभम नाडे, सुजय कदम आणि अक्षय तेली यांच्यासह अन्य दोन ते तीन जण थांबलेले होते. शुभम नाडे याच्या हाती चाकू होता. तिथे जमलेल्या लोकांना चाकूचा धाक दाखवित आमच्या मध्ये पडू नका. नाही इथेच खलास करु. त्यानंतर विशाल याला मारहाण करण्यात आली. विशाल नायडू याच्यावर खाजगी रुग्णलायात उपचार सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखळ केला आहे. परंतू या प्रकरणात अद्याप आरोपी अटक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रशांत देशमुख हा कुख्यात आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहे.

Web Title : कल्याण में कुख्यात गुंडे ने ठेकेदार पर हमला किया, पूछा 'क्या बहुत बड़ा हो गया है?'

Web Summary : कल्याण में एक रेलवे ठेकेदार पर कुख्यात गुंडे प्रशांत देशमुख (पीडी) ने धमकी देने के बाद हमला किया। ठेकेदार को बहुत बड़ा होने की चेतावनी दी गई थी। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है, लेकिन अभी तक कोई गिरफ्तारी नहीं हुई है।

Web Title : Notorious goon attacks contractor in Kalyan, asks if he's 'too big'.

Web Summary : A railway contractor in Kalyan was brutally attacked after receiving threats from notorious gangster Prashant Deshmukh (PD). The contractor was warned for growing too big. Police have filed a case, but no arrests have been made yet.