जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणी अटक अन् सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 10:03 PM2021-10-14T22:03:34+5:302021-10-14T22:04:25+5:30

Jitendra Awhad arrested and released : त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी दिली आहे. 

Jitendra Awhad arrested and released in Anant Karamuse assault case | जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणी अटक अन् सुटका

जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणी अटक अन् सुटका

Next
ठळक मुद्देहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट टाकल्याचा आरोप करीत इंजिनिअर अनंत करमुसे यांना घरातून नेऊन आव्हाड यांच्या बंगल्यात मारहाण करण्यात आली होती.

सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाण प्रकरणात तीन  पोलीस शिपायांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आज ठाकरे सरकारचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणेपोलिसांनी अटक करण्यात आली. नंतर न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी दिली आहे. 

गेल्या वर्षी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट टाकल्याचा आरोप करीत इंजिनिअर अनंत करमुसे यांना घरातून नेऊन आव्हाड यांच्या बंगल्यात मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्या वेळी मंत्री आव्हाड उपस्थित असल्याचे करमुसे यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते. ५ एप्रिल रोजी मध्यरात्री करमुसे यांना घरातून आव्हाडांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तिघा पोलिस शिपायांनी नेले होते. याप्रकरणी सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोंद झाली होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या प्रकरणात वर्तकनगर पोलिसांनी कारवाई करून तिघा पोलिस शिपायांना अटक केली होती.

Web Title: Jitendra Awhad arrested and released in Anant Karamuse assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app