मित्रांसोबत कुल्लू मनालीला फिरायला गेलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:08 IST2026-02-25T11:06:57+5:302026-02-25T11:08:24+5:30

दुपारी अडीच वाजता वीर बेडवरून खाली पडला. हा आवाज ऐकून मित्र धावले. त्यांनी वीरला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले परंतु रस्त्यात त्याच्या तोंडातून फेस बाहेर पडला.

Jharkhand Former CM Champai Soren grandson dies under suspicious circumstances after going on a trip to Kullu Manali with friends | मित्रांसोबत कुल्लू मनालीला फिरायला गेलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा संशयास्पद मृत्यू

मित्रांसोबत कुल्लू मनालीला फिरायला गेलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा संशयास्पद मृत्यू

Veer Soren Death:  झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचा नातू वीर याचा हिमाचल येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच चंपई सोरेन, त्यांचा मुलगा बाबूलाल सोरेन यांच्यासह घरातील सदस्य शिमलाकडे रवाना झाले आहेत. सध्या वीर सोरेन याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. स्थानिक पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा

माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचा नातू वीर सोरेन त्याच्या मित्रांसोबत कुल्लू मनाली येथे फिरायला गेला होता. ज्याठिकाणी बर्फात स्केटिंग केल्यानंतर तो मित्रांसह हॉटेलला पोहचला होता. याठिकाणी अचानक त्याची तब्येत बिघडली. वीर सोरेन याच्या मृत्यूची बातमी कळताच झारखंडच्या राजकीय वर्तुळात आणि कोल्हन परिसरात शोककळा पसरली. सध्या माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन हे कुटुंबासह शिमला येथे रवाना झालेत. 

डोकेदुखीचं खाल्लं होतं औषध

सोमवारी वीर सोरेन मित्रांसोबत कुल्लू मनाली येथील सोलांग व्हॅली येथे फिरायला गेला होता. तिथून परतल्यानंतर तो हॉटेलला पोहचला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो हॉटेलमध्येच थांबला आणि इतर मित्र फिरायला गेले. मित्र पुन्हा हॉटेलवर परतले तेव्हा वीरने त्याचे डोकं खूप दुखतंय असं मित्रांना सांगितले. त्यानंतर मित्रांनी त्याला औषध दिले. औषध घेऊन वीर झोपी गेला. दुपारी अडीच वाजता वीर बेडवरून खाली पडला. हा आवाज ऐकून मित्र धावले. त्यांनी वीरला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले परंतु रस्त्यात त्याच्या तोंडातून फेस बाहेर पडला. हॉस्पिटलमध्ये त्याला सीपीआर देण्यात आला परंतु काहीच उपयोग झाला नाही. अखेर तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, रुग्णालयातून पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तपासात एका स्टेचरवर वीर सोरेनचा मृतदेह पडला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले होते. या मृतदेहावर कुठल्याही प्रकारे खूणा नव्हत्या. परंतु पोस्टमोर्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल अशी माहिती डीसीपी के.डी शर्मा यांनी माध्यमांना दिली. 

Web Title : दोस्तों के साथ कुल्लू मनाली घूमने गए पूर्व मुख्यमंत्री के पोते की संदिग्ध मौत

Web Summary : झारखंड के पूर्व मुख्यमंत्री के पोते वीर सोरेन की मनाली में दोस्तों के साथ यात्रा के दौरान संदिग्ध रूप से मौत हो गई। स्केटिंग के बाद उन्हें अस्वस्थ महसूस हुआ, सिरदर्द के लिए दवा ली, और बाद में होटल में बेसुध पाए गए। पुलिस मौत के कारणों की जांच कर रही है।

Web Title : Ex-CM's Grandson Dies Suspiciously in Kullu Manali Trip with Friends

Web Summary : Jharkhand ex-CM's grandson, Veer Soren, died suspiciously in Manali during a trip with friends. He felt unwell after skating, took medicine for a headache, and was later found unresponsive at the hotel. Police are investigating the cause of death.