फेसबुकवरील प्रेमासाठी संसाराचा शेवट; ३ मुलांच्या आईने बॉयफ्रेंडसोबत मिळून केली पतीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:33 IST2026-02-11T12:32:01+5:302026-02-11T12:33:16+5:30

महिला आणि संबंधित तरुणाची अवघ्या ६ महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली होती, ज्याचं रूपांतर नंतर प्रेमसंबंधात झालं. यानंतर तिने आपल्या पतीला कायमचच रस्त्यातून बाजूला केलं.

jhansi mother of three children killed husband along with her lover | फेसबुकवरील प्रेमासाठी संसाराचा शेवट; ३ मुलांच्या आईने बॉयफ्रेंडसोबत मिळून केली पतीची हत्या

फोटो - ABP News

उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये तीन मुलांची आई प्रेमात इतकी वेडी झाली की, तिने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची गोळी झाडून हत्या केली. या हत्याकांडाचा खुलासा झाल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला. महिला आणि संबंधित तरुणाची अवघ्या ६ महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली होती, ज्याचं रूपांतर नंतर प्रेमसंबंधात झालं. यानंतर तिने आपल्या पतीला कायमचच रस्त्यातून बाजूला केलं.

१ फेब्रुवारी रोजी झाशीमध्ये 'जगभान कुशवाहा' या ट्रेन वेंडरची हत्या झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा हे प्रकरण अनैतिक प्रेमसंबंधातून घडल्याचं निष्पन्न झालं. जगभान हे चेन्नईमध्ये ट्रेन वेंडर म्हणून काम करायचे, तर त्यांची पत्नी आणि तीन मुलं झाशीत राहत होती. कामामुळे जगभान बहुतेक काळ घराबाहेर असायचे आणि दर ३-४ महिन्यांनी आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी ललितपूरला येत असत.

रेल्वे स्थानकाजवळ सापडला मृतदेह 

जगभान काही दिवसांसाठी आपल्या कुटुंबाकडे आले होते. काही दिवस थांबल्यानंतर ते पुन्हा चेन्नईला जाण्यासाठी झाशीहून ट्रेन पकडण्यासाठी आले होते. याच दरम्यान त्यांनी रेल्वे स्थानकाजवळ राहणाऱ्या एका नातेवाईकाची भेटही घेतली होती. मात्र दुसऱ्या दिवशी १ फेब्रुवारीच्या सकाळी रेल्वे स्थानकाजवळच त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला.

तपासातून झाला धक्कादायक खुलासा 

पोलीस तपासात समोर आलेल्या गोष्टींनी सर्वांनाच धक्का बसला. तपासात स्पष्ट झालं की, मृताची पत्नी किरण (४०) हिचे मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील रहिवासी असलेल्या शिवकुमार लोधी (३५) याच्याशी फेसबुकच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळले होते. पती घरी नसताना शिवकुमार अनेकदा किरणला भेटायला तिच्या गावी जात असे.

अवघ्या सहा महिन्यांतच दोघांचे प्रेम इतकं घट्ट झाले की, शिवकुमारने आपल्या हातावर किरणच्या नावाचा टॅटूही गोंदवून घेतला होता. मात्र त्यांच्या प्रेमात आता पती जगभान अडसर ठरू लागला होता. त्यामुळे दोघांनी मिळून जगभानला संपवण्याचा कट रचला. किरणनेच तिचा प्रेमी शिवकुमारला हत्येसाठी पिस्तूल उपलब्ध करून दिलं होतं. शिवकुमार आणि त्याच्या मित्राने जगभानची गोळी झाडून हत्या केली.

Web Title : फेसबुक प्रेम बना जानलेवा: पत्नी और प्रेमी ने मिलकर की पति की हत्या

Web Summary : उत्तर प्रदेश में फेसबुक पर हुए प्रेम संबंध में एक महिला ने अपने प्रेमी के साथ मिलकर पति की हत्या कर दी। छह महीने पहले शुरू हुआ प्रेम संबंध हत्या में बदल गया। पुलिस जांच में चौंकाने वाला खुलासा हुआ।

Web Title : Facebook Love Turns Deadly: Wife, Boyfriend Murder Husband, Father of Three

Web Summary : In Uttar Pradesh, a woman and her Facebook boyfriend murdered her husband. The affair, blossoming over six months, led her to eliminate her spouse, a train vendor, with her lover's help. The shocking crime was revealed during the police investigation.