शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चोरांचा कारनामा! ३२५ ग्रॅम सोनं, ५ किलो चांदी, पैसे... कुटुंब लग्नाला अन् घरातील ५० लाखांवर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:51 IST

एका सराफा व्यापाऱ्याचं घर आणि दुकान चोरांनी अशा वेळी टार्गेट केलं, जेव्हा संपूर्ण कुटुंब मुलीच्या लग्नासाठी बाहेर गेलं होतं.

उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये चोरीची एक मोठी घटना समोर आली आहे. एका सराफा व्यापाऱ्याचं घर आणि दुकान चोरांनी अशा वेळी टार्गेट केलं, जेव्हा संपूर्ण कुटुंब मुलीच्या लग्नासाठी बाहेर गेलं होतं. घर बंद असल्याचं पाहून चोरांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि सुमारे ५० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. एरच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसकिल बुजुर्ग गावात ही घटना घडली आहे.

चोरीची ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस आता या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. सराफा व्यापारी जितेंद्र सोनी हे आपल्या घरातूनच दागिन्यांचं दुकान चालवतात. त्यांच्या मुलीचं लग्न मध्य प्रदेशातील छतरपूर येथे होतं. ९ मार्च रोजी हा विवाह सोहळा पार पडणार होता. याच कारणास्तव ९ मार्च रोजी सकाळी १० च्या सुमारास संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून छतरपूरला रवाना झालं. घर आणि दुकान दोन्ही बंद होतं.

शेजाऱ्यांनी दिली चोरीची माहिती

कुटुंब गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांनी घराच्या मुख्य गेटची कडी तुटलेली पाहिली. संशय आल्याने त्यांनी तात्काळ फोन करून कुटुंबाला याची माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंब गावी परतलं. जेव्हा त्यांनी घराचा दरवाजा उघडला, तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्काच बसला. खोल्यांचं कुलूप तुटलेलं होतं, कपाटं उघडी होती आणि सर्व सामान विखुरलं होतं. तसेच दुकानाचं कुलूपही तुटलेलं आढळलं आणि तिथून मौल्यवान दागिने गायब होते.

५० लाखांचे दागिने आणि रोख गायब

मिळालेल्या माहितीनुसार, चोरांनी घर आणि दुकान दोन्ही पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. दुकानातून ५२ ग्रॅम सोनं, २ किलो चांदी आणि ३५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. तर घराच्या आतून व्यापाऱ्याच्या आईचे सुमारे २७३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ किलो चांदी आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरांनी पळवून नेली. अशा प्रकारे एकूण ३२५ ग्रॅम सोनं, ५ किलो चांदी आणि पैसे असा सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाली घटना

जेव्हा कुटुंबाने सीसीटीव्ही फुटेज तपासलं, तेव्हा त्यात संशयास्पद हालचाली दिसल्या. फुटेजमध्ये असं दिसून आलं की, ९ मार्चला जेव्हा कुटुंब लग्नासाठी निघत होतं, त्याच वेळी दोन बाईकरून आलेले तीन तरुण घराच्या आसपास फिरत होते. बराच वेळ ते तिथे थांबले आणि नंतर निघून गेले. याच वेळी चोरांनी घराची 'रेकी' केल्याचा संशय आहे. त्यानंतर रात्री २ च्या सुमारास चोर परत आले आणि त्यांनी चोरी केली. चोरी दरम्यान चोरांनी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. घरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी तोडून टाकले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Burglary: Thieves strike family's home during wedding, steal ₹50 lakh.

Web Summary : Jhansi family's home robbed of ₹50 lakh in gold, silver, cash during wedding. CCTV footage reveals suspects; police investigate.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीThiefचोरPoliceपोलिसMONEYपैसाGoldसोनंSilverचांदी