jewellry of worth One lakh 69 thousands stolen from a passenger's bag in the bus | बसमध्ये प्रवाशी महिलेच्या बॅगेतून एक लाख ६९ हजार किमतीच्या दागिन्यांची चोरी 

बसमध्ये प्रवाशी महिलेच्या बॅगेतून एक लाख ६९ हजार किमतीच्या दागिन्यांची चोरी 

देहूरोड : बसने प्रवास करीत असताना भुईंज ( सातारा ) येथे नाश्ता करण्यासाठी थांबलेल्या किवळे येथील एका महिलेच्या बॅगेतील एक लाख ६९ हजार किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचा प्रकार शनिवारी ( दि. ७) घडला आहे. देहूरोड पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात चोरीचा गुन्हा रविवारी ( दि १५ ) दाखल केला असून भुईंज पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. 
याबाबत पूनम प्रभाकर जाधव ( वय २९ , रा. किवळे ता हवेली, जि. पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुईंज ( सातारा ) येथे फिर्यादी पूनम जाधव या नाश्ता करण्यासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांची बॅग बसमध्ये ठेवलेली होती. बॅगेत दोन तोळे वजनाचे ६० हजार किमतीचे ब्रेसलेट, ८२ हजार रुपये किमतीचे पावणे तीन तोळ्यांचे गंठण, १५ हजार किमतीची अंगठी, १२ हजार रुपये किमतीची अंगठी असे एकूण एक लाख ६९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. देहूरोड पोलिसांनी हा गुन्हा भुईंज ( सातारा ) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने त्यांच्याकडे वर्ग केला असल्याचे सांगितले. 

Web Title: jewellry of worth One lakh 69 thousands stolen from a passenger's bag in the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.