Jammu and Kashmir security forces achieve great success, eliminate 7 terrorists including chief of Ansar Gajwatul Hind | जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा दलाला मोठं यश, अंसार गजवातुल हिंदच्या म्होरक्यासह ७ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा दलाला मोठं यश, अंसार गजवातुल हिंदच्या म्होरक्यासह ७ दहशतवाद्यांचा खात्मा

ठळक मुद्देशुक्रवारी सकाळी पुलवामाच्या त्राल भागात झालेल्या दुसर्‍या चकमकीत सुरक्षा दलाने दोन अज्ञात अतिरेकी ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात दोन चकमकींमध्येअंसार गजवतुल हिंद या दहशतवादी संघटनाचा प्रमुख इम्तियाज अहमद शाह यांच्यासह सात दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. शुक्रवारी पोलिसांनी ही माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “शोपियान येथे झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी तर पुलवामा जिल्ह्यातील त्रल भागात नौबाग येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. यापूर्वी काश्मीर झोनच्या पोलिसांनी सांगितले होते की, काल रात्री झालेल्या चकमकीनंतर शोपियांमधील मशिदीत लपलेल्या दोन दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पोलिसांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “लपलेल्या दहशतवाद्याचा भाऊ आणि स्थानिक इमाम साहेब यांना दहशतवाद्यांना बाहेर आणण्यासाठी व आत्मसमर्पण करण्यासाठी मशिदीच्या आत पाठवले गेले आहे. मशिदीला नुकसान होण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” आधीच्या ट्विटमध्ये पोलिसांनी सांगितले होते की, दहशतवादी संघटना अन्सार गजवतुल हिंदचा प्रमुख यालाही घेराव घालण्यात आले. त्यात म्हटले आहे, "बंदी घातलेली अतिरेकी संस्था एजीयूएच (जेईएम) चा प्रमुख घेरला आहे." गुरुवारी सायंकाळी शोपियानमधील चकमकीस सुरुवात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, तीन दहशतवादी ठार झाले आहेत आणि सुरक्षा दलाचे चार जवान जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी पुलवामाच्या त्राल भागात झालेल्या दुसर्‍या चकमकीत सुरक्षा दलाने दोन अज्ञात अतिरेकी ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Jammu and Kashmir security forces achieve great success, eliminate 7 terrorists including chief of Ansar Gajwatul Hind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.