ISIचा कट शिजतोय! दहशतवादी बनवू शकतात मालगाड्यांना आपला निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 06:38 PM2022-05-23T18:38:53+5:302022-05-23T18:39:40+5:30

ISI Plotting plan :आयएसआय भारताचे गंभीर नुकसान करण्याचा कट रचत आहे, असे या इशाऱ्यात म्हटले आहे.

ISI's plotting plan! Terrorists can target freight trains | ISIचा कट शिजतोय! दहशतवादी बनवू शकतात मालगाड्यांना आपला निशाणा 

ISIचा कट शिजतोय! दहशतवादी बनवू शकतात मालगाड्यांना आपला निशाणा 

googlenewsNext

चंदीगड : देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी पंजाब सरकारला खलिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवायांपासून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. गुप्तचर संस्थांनी इशारा दिला आहे की, पाकिस्तानचे आयएसआय पंजाब आणि पंजाब लगतच्या राज्यांमधील रेल्वे ट्रॅकला निशाणा साधण्यासाठी खलिस्तानी ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGWs) किंवा स्लीपर सेलचा वापर करू शकतात. आयएसआय भारताचे गंभीर नुकसान करण्याचा कट रचत आहे, असे या इशाऱ्यात म्हटले आहे.

सूत्रांच्या हवाल्याने एका मीडिया रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, आयएसआय रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या मालगाड्यांना लक्ष्य करण्याचा विचार करत आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, आयएसआय लाहोरमध्ये लपलेला दहशतवादी हरविंदर सिंग रिंडासोबत खलिस्तानच्या स्लीपर सेल आणि ओजीडब्ल्यूला मोठा फ़ंड देऊ करत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार आणि रेल्वे संरक्षण दलांना पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील रेल्वे नेटवर्कवर पाळत ठेवण्यास सांगितले आहे. त्याच वेळी, राज्यांमधील भारतीय रेल्वेच्या विभागीय कार्यालयांना तत्काळ प्रभावाशालीपणे ट्रॅकवर गस्त वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिख फॉर जस्टिसचीही नापाक भूमिका आहे
सुरक्षा एजन्सींनी गोळा केलेले पुरावे हे सिद्ध करतात की, भारतविरोधी घटक (AIEs) पंजाबमधील शांतता आणि सौहार्द भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आयएसआयला यश मिळू शकले नाही, तेव्हा त्यांनी सीमावर्ती राज्यात दहशतवाद पुनर्संचयित करण्यासाठी पंजाबवर लक्ष केंद्रित केले. शिख फॉर जस्टिस (SFJ) बब्बर खालसा आदी शीख दहशतवादी संघटना या कामात गुंतल्या होत्या.

खलिस्तानी नेटवर्कचा विस्तार!
परदेशात बसलेले दहशतवादी पंजाबच्या दिशाभूल तरुणांना शस्त्रे हाती घेऊन राज्यात दहशतवादी घटना घडवून आणण्यासाठी मदत करत आहेत. गुप्तचर माहितीनुसार, हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातून चार शीख दहशतवाद्यांना नुकतीच झालेली अटक आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आल्याने असे सूचित होते की, खलिस्तानी दहशतवादी त्यांचे जाळे इतर राज्यांमध्येही विस्तारत आहेत.

Web Title: ISI's plotting plan! Terrorists can target freight trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.