On Instagram, the police dragged the woman into their trap and sexually assaulted her | इंस्टाग्रामवरून तोतया पोलिसाने महिलेला ओढले आपल्या जाळ्यात अन् केला लैंगिक अत्याचार

इंस्टाग्रामवरून तोतया पोलिसाने महिलेला ओढले आपल्या जाळ्यात अन् केला लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देया प्रकरणी आरोपी बीड जिल्ह्यातील हिवराफाडी येथील किरण महादेव शिंदे यास पोलिसांनी अटक केली आहे.

राहाता : इन्स्टाग्रामवरून ओळख करून पोलीस भरतीमध्ये मदत करण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाविरोधात पीडितेने राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपी बीड जिल्ह्यातील हिवराफाडी येथील किरण महादेव शिंदे यास पोलिसांनीअटक केली आहे.


शिर्डी येथील महिलेशी मिशो ॲपच्या माध्यमातून ओळख तयार केली. या माध्यमातून आरोपीने महिलेशी मैत्री केली. पोलीस असल्याचे बनावट आयकार्ड व फोटो टाकून शिर्डी पोलीस ठाण्यात नोकरीस असल्याचे भासवून तिच्याशी जवळिकीचे संबंध तयार केले. पोलीस भरतीत मदत करतो. तू नवऱ्याला सोडून माझ्याशी लग्न कर, असे सांगून महिलेशी शारीरिक संबंध ठेवले.


तोतया पोलीस असल्याचा पीडितेला संशय आल्याने तिने विचारणा केली. या वेळी आरोपीने महिलेस त्याने मारहाण केली. त्यानंतर पीडितेने राहाता पोलिसात फिर्याद दिली.पोलिसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पोलिसाचे बनावट आयकार्ड, पोलीस ड्रेस व फोटो सापडले. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडोरे हे करत आहेत.

 

Web Title: On Instagram, the police dragged the woman into their trap and sexually assaulted her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.