शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज फेडण्यासाठी पत्नीचा वापर, पतीच करायचा व्हिडिओ शूट, १०० जणांना अडकवून पैसे उकळणाऱ्या दाम्पत्याला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:23 IST

कर्जापायी पत्नीचा वापर करून सेक्सटॉर्शन रॅकेट चालवणाऱ्या पतीचा पर्दाफाश

Crime News: एकीकडे सोशल मीडियाचा वापर जग जवळ आणण्यासाठी होत असताना, दुसरीकडे याचा वापर करून गुन्हेगारीचे नवीन प्रकार समोर येत आहेत. याचे धक्कादायक उदाहरण तेलंगणातील करीमनगरमध्ये समोर आले आहे. एका दाम्पत्याने तब्बल १०० हून अधिक पुरुषांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी ललिता आणि तिच्या पतीला अटक केली असून, त्यांच्याकडून महागड्या वस्तू आणि गाड्या जप्त केल्या आहेत.

असा रचला जायचा 'हनी ट्रॅप'चा सापळा

या सेक्सटॉर्शन रॅकेटची प्रमुख सूत्रधार ललिता इंस्टाग्राम आणि युट्यूबवर आपले आकर्षक फोटो आणि व्हिडिओ शेअर करून पुरुषांना आकर्षित करायची. एकदा का एखादा पुरुष तिच्या जाळ्यात अडकला की, ती त्याच्याशी जवळीक साधून त्याला करीमनगरमधील आपल्या भाड्याच्या फ्लॅटवर बोलवायची. ललिताने आतापर्यंत सुमारे १०० पुरुषांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.

गुप्त कॅमेरा आणि पतीचा मास्टर प्लॅन

जेव्हा पीडित व्यक्ती ललितासोबत फ्लॅटमध्ये असायची, तेव्हा तिथे आधीच लावलेल्या गुप्त कॅमेऱ्यांद्वारे ललिताचा पती त्यांचे खाजगी क्षण रेकॉर्ड करायचा. या रेकॉर्डिंगची पीडिताला साधी कल्पनाही नसायची. व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर खरा ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू व्हायचा. "पैसे द्या, अन्यथा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू किंवा तुमच्या कुटुंबाला पाठवू," अशी धमकी देऊन हे दाम्पत्य पीडितांना लुबाडायचे.

व्यापाऱ्याच्या तक्रारीमुळे फुटले भांडं

एका व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीमुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला. या व्यापाऱ्याकडून या दाम्पत्याने आधीच १३ लाख रुपये उकळले होते. मात्र, त्यांची हाव संपली नव्हती. त्यांनी पुन्हा ५ लाख रुपयांची मागणी करत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. कंटाळलेल्या व्यापाऱ्याने अखेर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांनी सापळा रचून या पती-पत्नीला रंगेहाथ पकडले.

व्यवसायात नुकसान आणि कर्जाचा डोंगर

तपासानुसार, आरोपी पती हा रिअल इस्टेट आणि मार्बलचा व्यावसायिक होता. मात्र, व्यवसायात मोठे नुकसान झाल्यामुळे तो कर्जात बुडाला होता. घेतलेल्या प्लॉटचा हप्ता भरण्यासाठी आणि ऐषोआरामात जीवन जगण्यासाठी या दाम्पत्याने हा गुन्हेगारीचा मार्ग निवडला. धक्कादायक म्हणजे या दाम्पत्याला दोन लहान मुलेही आहेत.

पोलिसांनी केलेल्या छाप्यात आरोपींकडून अनेक स्मार्टफोन, आक्षेपार्ह व्हिडिओ, चॅट्स, बँकेचे चेक, रोख रक्कम आणि एक आलिशान कार जप्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडितांची संख्या १५०० पर्यंत असू शकते, मात्र बदनामीच्या भीतीने अनेक जण समोर येत नाहीत. जर यात कोणी अडकले असेल तर न घाबरता पुढे यावे. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल," असे आवाहन करीमनगर पोलिसांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife used to repay debt; couple arrested for honey trap.

Web Summary : Telangana couple arrested for honey trapping over 100 men, extorting lakhs. Wife lured victims via social media, husband filmed them, blackmailing for money. Business loss drove them to crime.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTelanganaतेलंगणा