शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला धोका देणे हा गुन्हा ठरू शकत नाही - हायकोर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 11:14 IST

प्रेमाच्या आणाभाका घेऊन, विवाहाचे अमिष दाखवून नंतर प्रेयसीला धोका देण्याचे प्रमाण गेल्या काही काळा वाढले आहे.

नवी दिल्ली - प्रेमाच्या आणाभाका घेऊन, विवाहाचे अमिष दाखवून नंतर प्रेयसीला धोका देण्याचे प्रमाण गेल्या काही काळा वाढले आहे. मात्र शरीरसंबंध ठेवल्यानंतर प्रेयसीला प्रेमात धोका देणे ही नैतिकदृष्ट्या कितीही वाईट बाब वाटत असली तरी हा गुन्हा ठरू शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बलात्काराचा आरोप झालेल्या एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय कायम ठेवताना उच्च न्यायालयाने शारीरिक संबंधांसाठीच्या सहमतीच्याबाबतीत आता 'नाही चा अर्थ नाही'च्या पुढे जाऊन 'हो चा अर्थ हो'इथपर्यंत पोहोचला आहे, असे सांगितले.  एका व्यक्तीने  विवाहाचे अमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत एका महिलेने गुन्हा दाखल केला होता. मात्र कनिष्ठ न्यायालयाने यासंदर्भात निर्णय देताना संबंधित व्यक्तीची मुक्तता केली होती, दरम्यान, या निर्णयाला पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने दोन सज्ञान व्यक्ती परस्पर सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित करत असतील तर तो गुन्हा ठरू शकत नाही, असे स्पष्ट केले. तसेच कनिष्ठ न्यायालयाच्या निकालामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी नव्हती, असे न्यायमूर्तींनी सांगितले. विवाहाचे अमिष दाखवत शरीरसंबंध ठेवल्याच्या आरोपांचा उपयोग संबंधित महिलेने आरोपीसोबत झालेले आपले शरीरसंबंध योग्य ठरवण्यासाठी केला. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतरसुद्धा या आरोपामधून स्वत:चे वर्तन योग्य असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिने वैद्यकीय तपासणीसही नकार दिला, असे हायकोर्टाने म्हटले आहे.   निकाल देताना कोर्टाने पुढे सांगितले की, सदर महिला शरीरसंबंधांसाठी आपली सहमती ही स्वेच्छेने नव्हे तर तर विवाहाचे अमिष दाखवून मिळवण्यात आल्याचे सांगत आहे. मात्र ही बाब सिद्ध  होऊ शकली नाही. पहिल्यांदा बलात्काराचा आरोप केल्यानंतर तीन महिन्यांनी ही महिला आरोपीसोबत आपल्या मर्जीने हॉटेलमध्ये जाताना दिसली. त्यामुळे तिला विवाहाचे अमिष दाखवण्यात आल्याच्या तिच्या दाव्यात फारशी सत्यता नसल्याचे समोर आले आहे.  

टॅग्स :Courtन्यायालयFamilyपरिवार