अहमदाबादहून लखनौला येणाऱ्या फ्लाईटमध्ये महिला क्रू मेंबरसोबत अश्लील कृत्य, एअरलाइनने उचलले हे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 14:20 IST2022-04-11T14:02:17+5:302022-04-11T14:20:34+5:30
Sexual Abuse : ते हैदराबादहून लखनौला जात होते. नशेच्या अवस्थेत त्याने महिला क्रू मेंबरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

अहमदाबादहून लखनौला येणाऱ्या फ्लाईटमध्ये महिला क्रू मेंबरसोबत अश्लील कृत्य, एअरलाइनने उचलले हे पाऊल
अहमदाबादहून लखनौला येणाऱ्या विमानात महिला क्रूसोबत 3 प्रवासी एकमेकांशी भिडले. या लोकांनी महिला क्रू मेंबरसोबत अश्लील कृत्यही केल्याचा आरोप आहे. यानंतर क्रू मेंबरने प्रवाशाला समजावण्याचा प्रयत्न केला. प्रवासी दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. ते हैदराबादहून लखनौला जात होते. नशेच्या अवस्थेत त्याने महिला क्रू मेंबरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विमान लखनऊ विमानतळावर उतरल्यानंतर महिलेने इंडिगो एअरलाइनकडे तक्रार केली. या प्रकरणाची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (CISF) देण्यात आली. सीआयएसएफने तिन्ही आरोपींना पकडून सरोजिनी नगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याप्रकरणी इंडिगो एअरलाइन्सने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्रदीप, कुलदीप आणि ज्ञानेंद्र या तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस भादंवि कलम २९४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध कारवाई करत आहेत.