Hyderabad gang rape case Social media apologizes and dissents over murder of doctor girl rapist | डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्याप्रकरणी सोशल मीडियावर खेद आणि असंतोष 
डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्याप्रकरणी सोशल मीडियावर खेद आणि असंतोष 

ठळक मुद्देआज मुख्य सूत्रधार ट्रक चालक मोहम्मद पाशाला अटक केली त्यानंतर इतर तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

हैदराबाद - हैदराबादमध्ये बुधवारी एका 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबराबाद पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार आज मुख्य सूत्रधार ट्रक चालक मोहम्मद पाशाला अटक केली त्यानंतर इतर तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण देशभरातून सोहंसील मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

पीडितेच्या हत्येनंतर ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला असून देशभरातील असंख्य ट्विटर वापरणाऱ्यांनी या घटनेबद्दल खेद आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. काहींनी आरोपीला डॉक्टर तरुणीला जाळून मारले त्याप्रमाणे सर्व लोकांसमोर आरोपींना जाळून मारा. तर काहींनी आरोपींना फासावर चढवा, असा संतप्त प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. भिवंडीचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच अभिनेत्री पायल रोहतगी हिने देखील एक ट्विट केले असून त्यात तिने म्हटले आहे की, ‘मुस्लिम बहुल भागात हिंदू तरुणीला बलात्कार करून जाळून मारण्यात आले. देशातील माध्यमांनी ही बातमी प्रकर्षाने दाखवावी आणि पीडितेला न्याय मिळवून द्यावा. तसेच देशभरातून अनेक प्रतिक्रिया या अंगावर शहारा आणणाऱ्या घटनेनंतर उमटू लागल्या आहेत. 

Web Title: Hyderabad gang rape case Social media apologizes and dissents over murder of doctor girl rapist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.