खळबळजनक! दारुड्या पतीने पत्नीचा दगडाने ठेचून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 21:57 IST2020-07-18T21:55:46+5:302020-07-18T21:57:22+5:30
उईके दाम्पत्याचा १५ वर्षाचा मुलगा औषधी घेण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये गेला. याच कालावधीत शिवकुमारने दारूच्या नशेत पत्नीला दगडाने बेदम मारहाण केली.

खळबळजनक! दारुड्या पतीने पत्नीचा दगडाने ठेचून केली हत्या
यवतमाळ : शहरातील वाघापूर गावठाण परिसरात राहणाऱ्या दारूड्या पतीने पत्नीशी वाद घालत तिला दगडाने ठेचले. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मुलगा बाहेर गेल्याने शनिवारी दुपारी ३.३० वाजता घडलेली ही घटना सायंकाळी उघडकीस आली.
मीना शिवकुमार उईके (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती शिवकुमार उईके (४५) हा दारू पिऊन नेहमीच घरात गोंधळ घालत होता. शनिवारीसुद्धा भरदिवसाच शिवकुमार दारू पिऊन घरी आला. त्याने पत्नीला शिवीगाळ सुरू केली. नेहमीचेच भांडण म्हणून शेजाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. तर उईके दाम्पत्याचा १५ वर्षाचा मुलगा औषधी घेण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये गेला. याच कालावधीत शिवकुमारने दारूच्या नशेत पत्नीला दगडाने बेदम मारहाण केली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने खळबळ उडाली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल
गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा
अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार
...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'
मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला