पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ ठेवला व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस, म्हणून पतीने केले हे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 04:57 PM2022-01-14T16:57:55+5:302022-01-14T17:05:39+5:30

Husband posted a video while taking a bath of wife : गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जेव्हा पती-पत्नी ठाण्यात एकत्र राहत होते. तेव्हा आरोपी पतीने कथितरित्या तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.

Husband posted a video while taking a bath of wife on WhatsApp status, so the husband did this act | पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ ठेवला व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस, म्हणून पतीने केले हे कृत्य

पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ ठेवला व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस, म्हणून पतीने केले हे कृत्य

Next

मुंबई - पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट करुन तो व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी माहेरहून सासरी येण्यास नकार देत असल्याने नवऱ्याने हे टोकाचं धक्कादायक पाऊल उचललं. ठाण्यातील भिवंडी भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. ३० वर्षीय पतीला पोलिसांनी अटक केली आहे. 

३० वर्षीय तरुणाने पत्नी आंघोळ करताना तिचे व्हिडीओ शूटिंग केले होते. ही क्लीप त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस म्हणून ठेवली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर पत्नीने मालाडमधील कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याशिवाय, हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरार गावातील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय महिलेचे २०१५ मध्ये भिवंडीतील एका तरुणाशी लग्न केले होते.महिलेच्या लग्नात तिच्या वडिलांनी जवळपास १२ लाख रुपये खर्च केले होते आणि ५ लाखांहून अधिक किमतीचे दागिनेही दिले होते. तरीही तिच्या सासरची मंडळी तिला हुंड्यासाठी त्रास देत होते आणि फ्लॅटची मागणी करत असल्याचा पत्नीचा आरोप आहे. सततच्या छळाला कंटाळून तिने दोन वेळा घर सोडले. अखेर कुरार येथे राहणाऱ्या आई-वडिलांकडे ती माहेरी परत आली होती.

अज्ञात मृतदेहामुळे लागला दुसऱ्या रहस्यमयी खुनाचा तपास, पतीला ठोकल्या बेड्या

हात जोडत ती विनवणी करत राहिली, पण नराधमाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन केला बलात्कार

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जेव्हा पती-पत्नी ठाण्यात एकत्र राहत होते. तेव्हा आरोपी पतीने कथितरित्या तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. काही महिन्यांपूर्वी ती घर सोडून गेली, त्यावेळी पतीने सासरी परत न आल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. गेल्या आठवड्यात पीडित पत्नीच्या लहान बहिणीने आरोपीच्या  व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर आपली बहीण आंघोळ करतानाचा व्हिडीओ पाहिला आणि बहिणीला सांगितलं. त्यावेळी पीडितेने तिच्या कुटुंबीयांशी चर्चा करून पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. भादंवि कलम 406, 498A, 506(2)यासह कलम 67अ आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Husband posted a video while taking a bath of wife on WhatsApp status, so the husband did this act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app